Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या“शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांव्यतिरिक्त…”; ममता बॅनर्जींचा मोठा गौप्यस्फोट

“शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांव्यतिरिक्त…”; ममता बॅनर्जींचा मोठा गौप्यस्फोट

दिल्ली | Delhi

गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.

- Advertisement -

दरम्यान पश्चिम बंगालच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी शिंदे सरकारला अवैध ठरवत गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी पाडण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशां शिवाय आणखीही काही देण्यात आले आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील नवं शिंदे सरकार लवकरच कोसळेल असं भाकीत ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले, पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही. बंडखोर आमदारांचा उल्लेख करत ममता म्हणाल्या, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील हॉटेलमध्ये लक्झरी लाइफ एन्जॉय केली. त्यासाठी पैसा कुठून आला? बंडखोर आमदारांना केवळ पैसाच पुरवला गेला नाही, तर इतर अनेक गोष्टी पुरवल्या गेल्या. या सर्व गोष्टी कुठून आल्या?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच, ‘मला विश्वास आहे की, हे सरकार पुढे चालणार नाही. कारण हे अनैतिक आणि असंविधानिक सरकार आहे. त्यांनी भलेही सरकार जिंकलं असेल पण ते महाराष्ट्राचं मन जिंकू शकत नाही. तुम्ही सत्तेचा गैरवापर करुन लोकशाहीवर बुलडोझर चालवू शकाल पण लोकशाही पद्धतीनं लोक तुमच्यावर बुलडोझर चालवतील.’ असं त्या म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या