जळगाव jalgaon । प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या Poet Bahinabai Chaudhary of North Maharashtra University अधिसभेवर Senate निवडून आलेल्या व्यवस्थापन प्रतिनिधीमधून Management representative व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी निवडणूक Election जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार एका जागेसाठी दोन अर्ज आले होत. यातील माघारीच्या शेवटच्या दिवशी सतिष पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने आता परिषदेवर महेश घुगरी Mahesh Ghugari यांची निवड Selection बिनविरोध झाली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून आलेल्या व्यवस्थापन प्रतिनिधीमधून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. सोमवारी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी झाली. छाननी अंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.आर.एल.शिंदे यांनी जाहिर केली होती. त्यामध्ये महेश घुगरी (धुळे एज्युकेशन सोसायटी, धुळे) व सतीश पाटील (किसान विद्या प्रसारक संस्था, पारोळा) यांचा त्यामध्ये समावेश होता.
रविवार दि.5 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. रविवारी सतिश पाटील यांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे केवळ श्री घुगरी यांचा अर्ज आता राहिला आहे. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. दि. 9 डिसेंबर रोजी होणार्या अधिसभेच्या बैठकीत त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
9 रोजी होणार्या बैठकीकडे लक्ष
घुगरी यांची निवड बिनविरोध निश्चित असल्याचे बोलले जात आहे. याबाबतची आता औपचारिकता बाकी आहे. मात्र तरीही गुरुवारी 9 डिसेंबर रोजी होणार्या अधिसभेच्या बैठकीत निवडीबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.