Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमनिष सिसोदिया यांना 'सर्वोच्च' दिलासा! जामीन मंजूर, १७ महिन्यांनंतर जेलमधून सुटणार

मनिष सिसोदिया यांना ‘सर्वोच्च’ दिलासा! जामीन मंजूर, १७ महिन्यांनंतर जेलमधून सुटणार

दिल्ली । Delhi

- Advertisement -

दिल्लीचे (Delhi) माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Deputy Minister Manish Sisodia) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

कथित दिल्ली मद्यघोटाळा प्रकरणात सीबीआय (CBI) आणि ईडीने (ED) केलेल्या कारवाईमध्ये मनिष सिसोदिया यांना सुसर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून तब्बल १८ महिन्यानंतर ते जेलमधून बाहेर येणार आहेत.

मनिष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर आज दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर अटी घातल्या आणि त्यांना त्यांचे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश दिले. त्यांना दर सोमवारी पोलिस ठाण्यात साक्ष द्यावी लागणार आहे. यासोबतच साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नका, असे न्यायालयाने सांगितले.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या ‘जनसन्मान यात्रे’त गुलाबी रंगाची हवा; गुलाबी जॅकेट, बस अन् बरचं काही

तसेच न्यायालयाने त्यांना सचिवालयात जाण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सुनावणीनंतर ६ ऑगस्ट रोजी निर्णय राखून ठेवला होता.न्यायालयाने सिसोदिया यांना १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या दोन जामिनावर जामिनावर सोडण्याचे निर्देश दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या