Saturday, September 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमनमाडला वादळी पावसाचा तडाखा

मनमाडला वादळी पावसाचा तडाखा

भिंत कोसळून एक ठार; महिला गंभीर जखमी; कांदा भिजल्याने नुकसान

- Advertisement -

मनमाड | प्रतिनिधी Manmad

राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र वळवाच्या पावसाने शहर परिसरात काल आणि आज धुमाकूळ घातला. पावसासोबत असलेल्या वादळी वार्‍याने थैमान घातल्याने कांद्याचे शेड उध्वस्त झाल्यामुळे त्यातील शेकडो क्विंटल कांदा भिजून खराब झाला. या पावसात अंगावर भिंत पडून एकाच मृत्यू झाला तर ठिकठिकाणी झाडे उल्मळून पडली. मोठ्या प्रमाणात विजेचे खांब जमीनदोस्त झाल्यामुळे तब्बल ९ तास पहाटे पर्यत वीज पुरवठा खंडित झाला होता.ठिकठिकाणी घरांची छप्पर उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त नागरिक, शेतकरी आणि कांदा व्यापार्‍यांनी केली.

पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वार्‍याने कांद्याचे शेड उद्ध्वस्त झाले. पावसाने शेकडो टन कांदा भिजल्याने शेतकरी आणि व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वादळी वार्‍यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेच्या तारा आणि खांब कोसळ्यामुळे तब्बल ८ तास वीजपुरवठा खंडित झाला होता अगोदरचं जीव घेणा उष्मा, डास आणि मच्छरांचा उछान्द आणि त्यात खंडित झालेला वीजपुरवठा त्यामुळे शहरातील नागरिकांना पहाटेपर्यत अक्षरशः जागरण करावे लागले.

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी रात्रभर काम करून विजपुरवठा सुरळीत केला. वादळाचा फटका अनेक घरांना देखील बसला मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात अनेकांचे संसार उघड्यावर आले. काही ठिकाणी भिंती पडल्या तर टपर्‍या देखील हवेत उडून जाऊन लांब पडल्या. दरम्यान रमाबाई नगर भागातील संजय संसारे, आशा संसारे हे पती, पत्नी घरात झोपलेले असताना वादळी वार्‍यामुळे त्यांच्या अंगावर भिंत कोसळली त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले उपचारा दरम्यान संजय यांचा मृत्यू झाला तर पत्नी आशा गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना मालेगावच्या सामान्य रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...