Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil : "मला चारही बाजूने घेरलं, माझ्या समाजाला…"; जरांगेंचा नारायण...

Manoj Jarange Patil : “मला चारही बाजूने घेरलं, माझ्या समाजाला…”; जरांगेंचा नारायण गडावरून सरकारवर निशाणा

मुंबई | Mumbai

राज्यभरात दसरा, विजयादशमी निमित्ताने आज दसरा मेळाव्यांचे (Dussera Melava) आयोजन करण्यात आले असून राज्यातील चार ठिकाणी दसरा मेळावा पार पडत आहे. यातील दोन मेळावे मुंबईत (Mumbai) तर दोन बीड जिल्ह्यात (Beed District) होत आहे. यात महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष हे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) पहिल्यांदाच होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे लागले होते. जरांगेंचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायण गडावर पार पडला. यावेळी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Raj Thackeray : “बेसावध राहू नका, हीच क्रांतीची वेळ”; राज ठाकरेंचे पॉडकास्टच्या माध्यमातून मतदारांना आवाहन

यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “प्रथम या जनसमुदायाच्या चरणी मी मनापासून नतमस्तक होत आहे. खरंच वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल. मी खोटं बोलत नाही,अर्ध्याच्यावर लोकं सरकारी दवाखान्यात जातील. नजर जाईल एवढे लोकं येतील असं खरंच वाटलं नव्हतं. मला एकजण म्हणाला ५०० एकर असतं का कुठं असं म्हणत होता. आता तो दिसत नाही. मी मीडियाला (Media) कधीच विनंती केली नाही. पण आता करतो. चारही बाजूला कॅमेरे फिरवा. तुम्ही फ्रेम दिले असले तरी एकदा मात्र हा जनसमुदाय राज्याला दिसू द्या. कानाकोपऱ्यातील बांधव दिसू द्या एकदा दाखवाच,नुसती गर्दी पाहूनच त्यांचा कार्यक्रम होईल”, असे जरांगेंनी म्हटले.

हे देखील वाचा : RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना आवाहन; म्हणाले, “दुर्बलता…”

पुढे ते म्हणाले की, “मला तुमचे लेकरं अधिकारी बनलेले पाहायचे आहेत. आपले लेकरं प्रशासनात (Administration) जाऊ द्यायचे नाही, अशी लोकांची इच्छा आहे. मात्र आपले लेकरं प्रशासनात घातल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपल्याला डावलले जात असून आपल्यावर अन्याय होत आहे. जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपल्याला यावेळी उलथापालथ करावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. आपल्या नाकारव टिच्चून कुठला निर्णय होणार असेल आणि या राज्याच्या समाजावर अन्याय होणार असेल गाडावच लागणार. शेवटी आपल्याला आपला समूदाय महत्तवाचा आहे. जनता महत्त्वाची आहे. आपल्यासाठी आपला शेतकरी महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला तुमच्याकडून एकच वचन हवंय. फक्त हट्ट करून नका,मी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला ते करावंच लागेल. मी तुमच्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही. मी आता त्यांना माझा इंगा दाखवतो, ते नाटकं करत आहेत”, असे मनोज जरांगेंनी म्हटले.

हे देखील वाचा : टेकऑफनंतर विमानात तांत्रिक बिघाड, १४० प्रवाशांसह विमानाच्या हवेतच चकरा, अखेर…; त्रिची विमानतळावर घडलं थरार नाट्य

जरांगे पुढे म्हणाले की, “आम्ही कधीच गप्प बसत नाही. कारण आम्ही क्षत्रीय मराठे (Marathe) आहोत. मी फार विचित्र प्राणी आहे. माझ्या एखाद्या शब्दामुळे माझ्या समाजाला दुष्परिणाम भोगावे लागतील म्हणून मी बोलत नाही.मी आज अन्यायाविरोधील एक गोष्ट सांगणार आहे. लढायचं शिका. हिंदू धर्माने अन्यायाविरोधात शिकवले. कायदा आणि संविधानाने अन्यायाविरोधात लढण्याचे शिकवले आहे. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे संविधानाने शिकवले आहे. आज गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून उठाव चालू आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी केली जात आहे. इथे जातीचा संबंध नाही. प्रत्येक जातीने राज्य आणि केंद्राची सुविधा घेतली. आम्ही १४ महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. तुमच्यामुळे आरक्षणाला धक्का लागत आहे, असे काहीजण सांगत आहेत.मात्र, आता केंद्राने ओबीसींमध्ये १७ जातींचा समावेश केला त्यावेळी तुमच्या जातीला धक्का लागला नाही का?” असा सवाल यावेळी मनोज जरांगेंनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : राज्यातील होमगार्ड्ससाठी आनंदवार्ता! मानधनात होणार दुप्पट वाढ

तसेच “मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आले आहेत. मला पूर्ण घेरले आहेत. मी या गडावरून एकही शब्द खोटं बोलणार नाही. मला होणाऱ्या वेदना माझ्या समजाला सहन होत नाहीत. समाजाला होणाऱ्या वेदना मलाही सहन होत नाहीत. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतो. पण माझा नाईलाज आहे. या राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की तुमच्यामुळं कलंक लागू देऊ नका. पक्ष-पक्ष करू नका. सारखं नेता नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका. समाज सांभाळा,मला चारही बाजूने घेरलं आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या