Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यातील होमगार्ड्ससाठी आनंदवार्ता! मानधनात होणार दुप्पट वाढ

राज्यातील होमगार्ड्ससाठी आनंदवार्ता! मानधनात होणार दुप्पट वाढ

मुंबई । Mumbai

राज्यातील ५५ हजार होमगार्ड्सना सरकारने दसऱ्याचं मोठं गिफ्ट दिलं आहे. होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. हे मानधन देशात सर्वाधिक असल्याचंही फडणवीसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे.

याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे ५५,००० होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. १ ऑक्टोबर २०२४ पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे ११,२०७ होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते आहे. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ताज्या बातम्या

मोठी बातमी! CJP चे जंतरमंतरवरील आंदोलन अखेर मागे; केंद्र सरकारकडून सर्व...

0
नवी दिल्ली | New Delhi केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेले 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) आंदोलन...