Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौरा; 'असे'...

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौरा; ‘असे’ आहे नियोजन

मुंबई | Mumbai

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation ) मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा (Maharashtra Tour) करणार आहेत. येत्या १५ नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून २३ नोव्हेंबरला हा दौरा संपणार आहे. मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र दौरा करत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

कोल्हापूर (Kolhapur) येथील छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून मनोज जरांगे पाटलांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार असून या दौऱ्याचा शेवट शेवगावमध्ये होणार आहे. तर ०१ डिसेंबरपासून मराठा समाजाचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात साखळी उपोषण (Hunger Strike) सुरू राहणार असून या दौऱ्यासाठी कुणीही कुणाकडे पैसे मागू नयेत, तसे लक्षात आले तर कारवाई केली जाईल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

विधानपरिषद मतदारसंघाची पुनर्रचना आवश्यक; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची अपेक्षा

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, समाजातील डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिक, अधिकारी, राजकारणी, श्रीमंत, गरीब कुणीही दौऱ्याच्या नावाखाली कुणाला पैसे देऊ नयेत. हा गरीब मराठ्यांचा लढा आहे, तो मराठे लढत आहेत. लोक स्वखर्चाने दौऱ्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे देणाऱ्यांनीही पैसे देऊ नयेत. कारण त्यामुळे आंदोलनाला डाग लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेले दौरे आणि सभेचा खर्च कधी कुणाला मागितलेला नाही. त्यामुळे येथून पुढे सुद्धा कुणी पैसे देऊ नयेत. कुणी म्हणेल, पाटील तसं म्हणत असतात, त्यांना तसेच म्हणावे लागेल. तरी ऐकू नका आणि पैसे देऊ नका. हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी असून पैसे कमावण्यासाठी नाही, असेही जरांगेंनी स्पष्ट केले.

असा आहे जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा

१५ नोव्हेंबर – वेळ सकाळी ११ वाजता अंतरवाली ते वाशी, दुपारी ४.३० वाशी ते पारांडा, रात्री ७.३० परंडा ते करमाळा

१६ नोव्हेंबर- सकाळी ११ वाजता करमाळा ते दौंड, दुपारी ५ वाजता दौंड ते मायणी

१७ नोव्हेंबर – सकाळी १० वाजता मायणी ते सांगली, दुपारी ०२ वाजता सांगली ते कोल्हापूर, दुपारी ०५ वाजता कोल्हापूर ते इस्लामपूर, रात्री ८ वाजता इस्लामपूर ते कराड

१८ नोव्हेंबर-सकाळी १० वाजता कराड ते सातारा, दुपारी १ वाजता सातारा ते मेढा, दुपारी ४ वाजता मेढा ते वाई, रात्री ९ वाजता वाई ते रायगड

१९ नोव्हेंबर – सकाळी ९ ते १ रायगड दर्शन – पाचाड ते रायगड, दुपारी ३ वाजता महाड दर्शन, रात्री ७ वाजता रायगड – मुळशी-आळंदी

२० नोव्हेंबर – सकाळी ९ वाजता आळंदी ते तुळापूर-छत्रपती संभाजीराजे अभिवादन, सकाळी ११ वाजता तुळापूर ते पुणे (खराडी,चंदननगर), दुपारी ३ वाजता पुणे ते खालापूर, सायंकाळी ६ वाजता खालापूर ते कल्याण

२१ नोव्हेंबर – सकाळी १० वाजता कल्याण ते ठाणे, दुपारी ३ वाजता ठाणे ते पालघर, रात्री ८ वाजता पालघर ते त्र्यंबकेश्वर

२२ नोव्हेंबर- सकाळी ११ वाजता त्र्यंबकेश्वर ते विश्रांतगड, दुपारी ३ वाजता विश्रांतगड ते संगमनेर, सायंकाळी ६ वाजता संगमनेर ते श्रीरामपूर

२३ नोव्हेंबर – सकाळी १० वाजता श्रीरामपूर ते नेवासा, दुपारी १ वाजता नेवासा ते शेवगाव, दुपारी – ५ वाजता शेवगाव ते बोधेगाव, धोंडराई, सायंकाळी ७ वाजता धोंडराई ते अंतरवाली सराटी

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

घरकुल योजना भारी… पण आता न परडणारी।

- Advertisment -

ताज्या बातम्या