Wednesday, October 21, 2026
Homeराजकीय५०० कोटी दिलेत की नाही? सांगा थोरल्या बेगम...; मनोज जरांगेंचा रामदास कदमांवर...

५०० कोटी दिलेत की नाही? सांगा थोरल्या बेगम…; मनोज जरांगेंचा रामदास कदमांवर पलटवार

मुंबई । Mumbai

शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधत “तुझी गाठ आमच्याशी आहे,” असा थेट इशारा दिला होता. कदमांच्या या इशाऱ्यानंतर आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत धारदार शब्दांत पलटवार केला आहे. रामदास कदमांचा ‘थोरली बेगम’ असा एकेरी उल्लेख करत जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ५०० कोटींच्या मुद्द्यावरून घेराबंदी केली आहे.

- Advertisement -

जालन्यात पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जुन्या आरोपांची पुनरावृत्ती करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर थेट प्रश्न उभे केले. जरांगे म्हणाले, “श्रीकांत शिंदे यांच्याकरवी मला ५०० कोटी रुपये देण्यात आले, ही गोष्ट खरी आहे का? यावर एकनाथ शिंदे यांनी जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे. मी श्रीकांत शिंदे यांच्याकडून ५०० कोटी रुपये घेतले आहेत का? या प्रश्नाचे ‘हो’ किंवा ‘नाही’ इतकेच साधे उत्तर त्यांनी द्यावे.”

जरांगे यांनी पुढे दावा केला की, “भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना तसे सांगण्याइतकी श्रीकांत शिंदे यांची राजकीय उंची नाही. त्यामुळे ही माहिती खुद्द एकनाथ शिंदे यांनीच भाजपाच्या वरिष्ठांना दिली असावी. ही गोष्ट खरी आहे की नाही, एवढेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, मी त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे.”

रामदास कदमांनी दिलेल्या इशाऱ्यावर आणि संपत्तीच्या चौकशीच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी त्यांचा समाचार घेतला. “मी तुमच्याकडे एका साध्या प्रश्नाचे उत्तर मागितले, पण तुम्ही चिडत आहात, बावचळून गेला आहात. भाजपा तुम्हाला संपवत आहे की तुम्ही मला संपवत आहात, या शब्दाचा अर्थ थोरल्या बेगमला कळला पाहिजे. रामदास कदम यांनी काल मेळाव्यात तेच बोलून दाखवले,” असा टोला जरांगे यांनी लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले, “रामदास कदम म्हणतात माझ्या संपत्तीची चौकशी करा. त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आहेत हे मान्य आहे, पण उगाच चिडचिड करू नका. शेवटी थोरल्या बेगमला चोमडेपणा करावाच लागला. माझ्या औकतीवर आणि स्वाभिमानावर बोलण्यापेक्षा मराठा समाजाच्या मूळ प्रश्नांवर बोला. आम्ही एकनाथ शिंदे यांना डोक्यावर घेतले होते, मग आज आम्ही त्यांना जाब का विचारू नये?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण वादात भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचाही सहभाग असल्याचा दावा जरांगे यांनी केला. “भाजपचे काही मोठे नेते आणि अगदी शुद्ध हिंदी बोलणाऱ्या काही महिला या प्रकरणावर बोलत आहेत. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूप कष्ट घेतले, आता त्यांनीच भाजपडून ५०० कोटी रुपये घेतले आणि माझ्या नावाचा वापर केला का, हे स्पष्ट करावे,” अशी आक्रमक मागणी करत जरांगे यांनी राजकारणातील संघर्ष आणखी तीव्र केला आहे. या ताज्या घडामोडींमुळे सत्ताधारी वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

सिंहस्थ

Nashik-Trimbakeshwar Kumbha Mela: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याहस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी...

0
नवी दिल्ली | New Delhiनाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik Trimbakeshwar) येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik Trimbakeshwar Sinhastha Kumbhamela) ध्वजारोहणाची (Flag Hoisting) तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली...