Monday, October 14, 2024
Homeनाशिकअन् अतिदुर्गम भागात मिळाले अनेकांच्या हाताला काम

अन् अतिदुर्गम भागात मिळाले अनेकांच्या हाताला काम

सुरगाणा | वार्ताहर Surgana

सुरगाणा तालुक्यातील चुली या गावातील मजुरांनी आज श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू राऊत याच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यल्यात ठिय्या आंदोलन करत तहसीलदारांच्या दालनात तब्बल दहा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते…

- Advertisement -

श्रमजीवी संघटनेच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण ग्रामपंचायत पैकी चुली या गावात रोजगार हमीचे काम मिळावे म्हणून तहसील कार्यालयाकडे रोजगार हमी कामाची मागणी केली होती.

मात्र, अद्यापही मजुरांना काम मिळाले नाही व कायद्याप्रमाणे कामाची मागणी केल्यानंतर 15 दिवसाच्या आत काम दिले पाहिजे. अशा असतानाही देखील पंधरा दिवस होऊन देखील काम मिळाले नाही. त्यामुळे सदर मजुरांवर हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मजुरांना दुसरा काहीही रोजगार नसल्याने. सर्व मजूर आज घरात बसून होते. त्याना काम मिळावे म्हणून तहसीलदार कार्यालयकडे रोजगाराची मागणी केली होती.

परंतु काम न मिळाल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात आंदोलन केले होते. त्यावेळी दोन दिवसात सर्व मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाईल असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिले होते. मात्र दोन दिवसात मजुरांना काम दिले नाही 15 दिवस झाले तरी काम उपलब्ध करून तहसीलदार यांनी दिले नाही.

यामुळे 18 ऑक्टोबर रोजी सकाळ पासून सर्व मजूर थेट तहसीलदार याच्या दालनात येऊन बसले आणि जोपर्यंत काम सुरू करत नाहीत आणि बेकार भता देत नाही तोपर्यंत कार्यल्यातून जनार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती. तब्बल दहा तासाच्या आंदोलनानंतर देखील मजूर तहसीलदार याच्या दालनात बसून होते. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत दालनातून जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

त्यानंतर तहसीलदार यांनी रात्री 10 वाजता आंदोलनकर्त्याना लेखी आश्वासन दिले होते की. 21 तारखेला काम उपलब्ध करून दिले जाईल आणि आज त्या मजुरांना काम उपलब्ध करून दिले आहे. मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या