Monday, June 15, 2026
HomeराजकीयMaratha Reservation : "मनोज जरांगे हे शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब"; भाजप आमदाराचे...

Maratha Reservation : “मनोज जरांगे हे शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब”; भाजप आमदाराचे खळबळजनक विधान

मुंबई | Mumbai

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु आहे. आज (शनिवार) त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून, सरकारकडून अद्याप कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. अशातच आता भाजपचे आमदार संजय केनेकर (MLA Sanjay Kenekar) यांनी खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

आमदार केनेकर म्हणाले की, “मनोज जरांगे हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे एक सूसाईड बॉम्ब आहेत. जरांगे यांच्यामुळे मराठा समाजाचे (Maratha Community) मोठे नुकसान होत आहे. हा सुसाईड बॉम्ब व्यक्तिगत द्वेषापायी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे.हा सुसाईड बॉम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहोचवेल. त्यामुळे निश्चितपणे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर जरांगे यांच्यासारखे सुसाईड बॉम्ब महाराष्ट्रात वापरतात याचे दुर्दैव आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच “शरद पवारांची कारकीर्द बघितली तर ती अशीच राहिलेली आहे. त्यांनी कुणालाच मुख्यमंत्री पदावर कायमचे बसू दिलेले नाही, त्यांचा इतिहास (History) तपासून पाहा. महाराष्ट्र अराजकतेकडे नेणे, जाती जातीत भांडणं लावणे हे काम पवारांनी केले आहे. वसंतदादांपासून ते वसंतराव नाईक यांच्या काळापर्यंत शरद पवारांनी राज्यात दंगली घडवल्या”, असा गंभीर आरोपही आमदार संजय केनेकर यांनी केला.

दरम्यान, आता आमदार संजय केनेकर यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP Sharad Pawar) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य सरकारचा मराठा समाजाला मोठा दिलासा

मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने (State Government) हालचाली सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाजातील पात्र लोकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला आता ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने काढला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsath) यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...