Saturday, September 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj jarange Patil: स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार आहात?...

Manoj jarange Patil: स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार आहात? मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज (31 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. याचदरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनावर आपली भूमिका मांडताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

- Advertisement -

मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरे एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचेही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा, मागच्या वेळी एकनाथ शिंदे यांनीच नवी मुंबईत जाऊन चर्चा केली होती. तर त्यांना यावर प्रश्न विचारला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंची शाळा घेतली.

याच मुद्द्याला धरुन मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं. कधीपर्यंत भाजपची री ओढणार आहात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील अशा शब्दात राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंनी सडेतोड प्रत्युत्तर देत टीका केली आहे.

राज ठाकरेंबद्दल मनोज जरांगे काय म्हणाले?
आम्ही तुम्हाला विचारलं का? मग तुम्ही आम्हाला का सल्ला देताय? एकदा तुम्ही भाजपसोबत जाता, नंतर पाठिंबा काढून घेता. तुम्ही ११ आमदार निवडून आणले तेव्हा आम्ही म्हटले का की, आता बस्स करा.. मराठवाड्यात कशाला शिरता. केव्हापर्यंत तुम्ही भाजपची री ओढणार आहात? स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं. स्वतः ठाकरे ब्रँडचं अस्तित्व खराब करून घेताय, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पुढे म्हणाले, तुम्ही त्यांच्या घरी जेवलात म्हणजे तुमचा कार्यक्रम लागलाच म्हणून समजा. तुम्हाला वाटतं तुम्ही फार हुशार आहात. मात्र गरीब मराठ्यांना सगळं कळतं. निवडणुका लागल्या कि तुम्हाला जवळ धरतात मात्र देत काहीही नाही. खासरकी, आमदारकीच्या निवडणुका जवळ आल्या कि तुम्हाला जवळ धरतात आणि मतदान मिळालं कि दुर लोटून देतात. आता नगरपालिकेचा निवडणुका जवळ आल्यात. त्यात ठाकरे बंधूनी एकत्र कार्यक्रम घेतला तर ते भयाभीत झालेत. पुन्हा मुख्यमंत्री जवळ येत तुमच्या घरी जेवलेत म्हणजे तुम्ही झालेत खुश मात्र त्यामुळे गेला तुमचा पक्ष खड्ड्यात. अशी बोचारी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : ५ सप्टेंबर २०२६ – जेन झीची नवी दिशा

0
भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आजवर अनेक पिढ्या आल्या आणि त्यांनी आपापल्या परीने देशाची दिशा व गती ठरवली. मात्र, आजच्या घडीला देशात एका नव्या, अत्यंत...