Wednesday, April 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil : उद्यापासून पाणी घेणं बंद करणार, जरांगेंची घोषणा; मराठा...

Manoj Jarange Patil : उद्यापासून पाणी घेणं बंद करणार, जरांगेंची घोषणा; मराठा आंदोलनाची धग वाढणार

राज ठाकरे यांच्यावरही केली टीका

मुंबई | Mumbai

मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. आज (रविवारी) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज जरांगे यांची मुंबईतील आझाद मैदानावर जे.जे.हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पथकानी तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी जरांगे यांचा रक्तदाब आणि ब्लड शुगर तपासणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे यांनी ब्लड शुगर चाचणीस नकार दिला. तरीही डॉक्टरांनी त्यांची इतर तपासणी केली. तपासणीनंतर जरांगेंची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

त्यानंतर मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उद्यापासून पाणी घेणे देखील बंद करणार आहे. राज्य सरकारने (State Government) हे समजून घ्यावं की ही आमची गर्दी नाही, वेदना आहे. तसेच मराठ्यांच्या (Maratha) नावाखाली पैसे जमवू नये असे आवाहनही त्यांनी केले.

पुढे ते म्हणाले की, “आम्हाला मुंबईतील (Mumbai) श्रीमंत आणि गरीब सगळे जण मदत करत आहेत. जे कोण महाराष्ट्रातून इकडे येत आहेत त्यांनी वाशी, मशीद बंदर आणि इतर ठिकाणी आपली वाहने पार्किंग करावी. याठिकाणी वाहनांना जागा नाही. जे जे जेवण वाटप करत आहेत. त्यांना सांगतो तुम्ही काय ते वाटप करत या. पण, थेट ट्रक इथे आणू नका. अन्नछत्र सुरू केले आहे त्यासाठी पैसे मागू नका”, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.

तसेच “मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) घ्यायला मी खंबीर आहे. तसेच आंदोलन संपूद्या मग निलेश राणे यांच्याकडे बघतो. दादांना सांगितलं होत त्यांना शांत बसवा. राज ठाकरे (Raj Thackeray) कुचक्या कानाचे आहेत. चंद्रकांत पाटील यांनी शांत राहावं, त्यांनीच पडताळण्या रोखल्या होत्या”, असा दावाही मनोज जरांगे यांनी केला.

दरम्यान, राजकीय लोक नेते, मंत्री हे नासके असतात. हैदराबाद आणि साताऱ्याचे (Satara) गॅझेट पुरावे म्हणून आहेत. आमची मागणी संविधानाला धरून आहे. मराठे आता घरी थांबणार नसून पुढच्या शनिवार आणि रविवारी यापेक्षा आणखी मोठी गर्दी होईल”, असेही मनोज जरांगे म्हणाले.


ताज्या बातम्या

Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर गृहमंत्री सुदान गुरुंग...

0
काठमांडू । Kathmandu नेपाळच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारमधील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी आपल्या पदाचा...