Sunday, May 10, 2026
Homeमनोरंजनमहेश कोठारेंच्या समर्थनार्थ मराठी अभिनेत्री उतरली मैदानात; उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या! कोठारेंवर...

महेश कोठारेंच्या समर्थनार्थ मराठी अभिनेत्री उतरली मैदानात; उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली!…

मुंबई | Mumbai
‘मी भाजप भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे’ असे म्हणून दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे वादात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी महेश कोठारेंवर बरीच टीका केली. अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या आहेत, म्हणून ते अशी मुक्ताफळे उधळतायत, अशा शब्दांत किशोरी पेडणेकरांनी निशाणा साधला होता. तर महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते, असा टोला संजय राऊतांनी लगावला होता. दरम्यान, आता या सगळ्या प्रकरणावर मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती मेघा धाडे यांनी महेश कोठारे यांची बाजू घेतली आहे.

नेमकं काय म्हणली मेघा धाडे?
महेश कोठारे यांची बाजू घेत मेघाने पोस्ट केली, त्यात तीने शिवसेना आणि मनसे पक्षावरही टीका केली आहे. उर्मिला मातोंडकर, महेश कोठारे यांचीही नावे घेतली आहे. मेघाने पोस्टमध्ये लिहिलेय, “अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उध्दव सेना जॉइन केली होती तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती तरी कोणी आक्षेप घेतला नाही. परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली.”

- Advertisement -

मेघाने पुढे लिहिलेय, “हे असे झाले कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले कोणत्या तिकीटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही. एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे. जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवार करतोय. जो मुंबईकर आधी ट्रॅफिक मध्ये अडकायचा आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय. त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उध्दव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली! आणि हे सत्यात देखील उतरणार आहे.”

मेघाने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महेश सर तुम्ही जे बोललात ते तुमचे मत होते, जे तुम्ही मनापासून व्यक्त केले. आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे. बाकी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कारण, कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना”.

महेश कोठारे नेमकं काय म्हणाले होते?
बोरिवलीत आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारे म्हणाले होते, “मी भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहेत. आता जर या विभागातून नगरसेवक नसेल तर महापौर निवडला जाईल.”

ताज्या बातम्या

Shirdi : अशोक खरातची रवानगी नाशिक कारागृहात

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली...