Saturday, April 26, 2025
Homeमनोरंजनमराठी कलाकार करणार प्रेक्षकांना कॉल्स!

मराठी कलाकार करणार प्रेक्षकांना कॉल्स!

मुंबई |Mumbai – मोबाईलवर जर तुम्हाला हॅलो म्हटल्यावर समोरून मी आदेश बांदेकर बोलतोय, निलेश साबळे बोलतोय, भाऊ कदम बोलतोय, राणादा बोलतोय असे आवाज आले तर आश्चर्य वाटून घेऊ नये.

कारण ही आपली आवडती कलाकार मंडळी तुमच्याशी संवाद साधणार आहेत, कारण जसजसा 13 जुलै मनोरंजनाचा शुभारंभ जवळ येतोय, तसतसं कलाकार मंडळींमध्ये सुद्धा उत्साह शिगेला पोहचला आहे, त्यामुळे आता ही मंडळी हात धुवून मनोरंजन करायच्या मागे लागली आहेत.

- Advertisement -

13 जुलै पासून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कोरोनाच्या संकटाचा विचार करता, योग्य ती सर्व खबरदारी घेऊन चित्रीकरण केले जात आहे.

जवळपास साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे पुनरागमन होणार आहे आणि याचनिमित्ताने झी मराठीचे लाडके कलाकार प्रेक्षकांना रेकॉर्डेड फोन करून आपल्या कमबॅकबद्दल सांगणार आहेत.

भाऊ कदम, डॉ. निलेश साबळे, आदेश बांदेकर, निवेदिता जोशी- सराफ, अनिता दाते, हार्दिक जोशी हे स्वतःहून प्रेक्षकांना फोन करून त्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहेत.

तब्बल 50 लाख कॉल्स करून प्रेक्षकांना आपल्या पुनरागमनाबद्दल सांगणार आहेत. याआधी क्वचितच कोणत्याही कॅम्पेनसाठी खुद्द कलाकारांनी पुढाकार घेऊन चाहत्यांना असा थेट फोन केला असेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...