Monday, October 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमराठी आमचा श्वास, हिंदुत्व आमचा आत्मा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी आमचा श्वास, हिंदुत्व आमचा आत्मा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'जय गुजरात' घोषणे नंतर दिले स्पष्टीकरण

- Advertisement -

मुंबई |

पुणे येथील जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात भाषण संपवताना ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यानंतर विरोधकांनी शिंदेंवर टीका केली होती. यावर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मराठी बद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही. मराठी आमचा श्वास, हिंदुत्व आमचा आत्मा आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण केलं जात आहे. गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांची ही शिवसेना आहे. त्यामुळे मी आधी जय हिंद म्हणालो, जय महाराष्ट्र म्हणालो’ असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पुण्यातील गुजराथी बांधवांनी उभारलेल्या एका कॉम्प्लेक्सच आज लोकार्पण करण्यात आले. माझ्या भाषणाच्या शेवटी मी जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हणतो. जय हिंद म्हणजे देशाच्या अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे राज्याचा अभिमान. आज पुण्यातील गुजराती लोकांसाठी कार्यक्रम होता. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभुमी मानली आहे, त्यामुळे मी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं म्हटलो.’

त्याच बरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ जुना व्हिडिओ दाखवत , उद्धव ठाकरे हेही जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं म्हणत आहे. तसेच शिंदेंनी आणखी एक पत्र दाखवले, ज्यामध्ये ‘मुंबई मा जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंचा एक पोस्टर दाखवत त्यावर ‘केम छो वरळी’ असं लिहिलेलं आहे असंही शिंदेंनी सांगितलं.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला मिळतोय हा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 375 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 3963 क्रेटस् ची...