Saturday, March 29, 2025
Homeनाशिकविवाहितेची दारणा नदीच्या बॅक वॉटरमध्ये उडी मारून आत्महत्या

विवाहितेची दारणा नदीच्या बॅक वॉटरमध्ये उडी मारून आत्महत्या

घोटी | प्रतिनिधी |Ghoti

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) समनेरे (Samnere) येथील २४ वर्षीय विवाहित युवतीने जवळच असणाऱ्या दारणा नदीच्या (Darna River) बॅक वॉटरमध्ये उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, नेत्रा उर्फ हर्षदा शंकर गायकवाड (वय २४) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे (Young Woman) नाव असून ती रविवार (दि.२६ मे) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. रात्री शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दारणा नदीच्या फुगवट्या जवळील सुखदेव जाधव यांच्या शेतातील पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी घोटी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर या युवतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

दरम्यान, मयत युवतीचे समनेरे हे माहेर असून कोरपगाव येथील तिचे सासर होते. गेल्या ४ वर्षांपासून ही युवती समनेरे येथे माहेरीच राहत होती. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station)आकस्मिक मृत्युची (Death)नोंद करण्यात आली असून या युवतीने आत्महत्या का केली याचा तपास घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनिल धुमणे आणि पोलीस पथक करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।

0
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....