Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमPathardi : विवाहिता बाळासह तरुणासोबत पळाली; इन्स्टाग्रामवर जडलं प्रेम

Pathardi : विवाहिता बाळासह तरुणासोबत पळाली; इन्स्टाग्रामवर जडलं प्रेम

पतीची पोलिसात धाव, तेरा तोळे सोनेे आणि अडीच लाख लंपास

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावातील विवाहित महिलेने पंधरा महिन्यांच्या बालकासह घरातून सोन्याचे दागिने व मोठी रक्कम घेऊन पसार झाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली असून पतीने याबाबत पाथर्डी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिलेने तेरा तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घराच्या मागील दरवाज्यातून मुलाला घेऊन बाहेर पडली. त्यावेळी तिचा पती कामानिमित्त अहिल्यानगर येथे गेलेला होता. सासू-सासरे समोरच्या खोलीत टी.व्ही. पाहत असताना घरातील कुणालाही तिच्या हालचालींचा थांगपत्ता लागला नाही. नंतर घरात पडताळणी केली असता कपाटातील तेरा तोळे सोन्याचे दागिने व अंदाजे अडीच लाख रुपये गायब असल्याचे समोर आले.

YouTube video player

महिलेची इन्स्टाग्रामवर एका युवकाशी ओळख झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर कधी झाले आणि पळून जाण्याची तयारी कशी झाली याबाबत कुटुंबीय अनभिज्ञ होते. संबंधित युवक शेजारच्या गावात एका कापड दुकानात काम करीत असल्याचे समजते. दोघेही एकाच वेळी गायब झाल्याने गावात विविध चर्चांना उधाण आले आहे. यामुळे एक कुटुंब मानसिक धक्क्याखाली आणि आर्थिक संकटात सापडले आहे. या घटनेची नोंद पाथर्डी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पथकांकडून महिलेचा व संबंधित युवकाचा तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाने पश्चिम भागातील परिसरात तसेच तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Nashik BJP Politics : भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा

0
नाशिक | प्रतिनिधी भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आपल्याकडे असलेल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...