Friday, May 29, 2026
Homeक्राईमCrime News : बाळासाठी दबाव टाकल्याने विवाहितेची आत्महत्या

Crime News : बाळासाठी दबाव टाकल्याने विवाहितेची आत्महत्या

सासू-सासर्‍याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋतुजा अर्जुन खुटवड असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

दरम्यान, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सासू-सासर्‍याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरे प्रकाश एकनाथ राजळे व सासू भारती प्रकाश राजळे (दोघे रा. तिसगाव, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत. यासंदर्भात मयत ऋतुजा खुटवड यांच्या आई नंदा अर्जुन खुटवड (वय 50 रा. प्रभुपिंपरी, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा खुटवड या सध्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत राहत होत्या. 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संशयित आरोपी यांनी ऋतुजावर बाळासाठी दबाव टाकणे, तसेच तिच्यावर वारंवार प्रश्नांचा भडीमार करून मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून ऋतुजाने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत’ पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पोचे दिमाखात उदघाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिकमधील नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित ‘पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत...