Sunday, February 9, 2025
Homeनगरमणिपुरमध्ये शांतता नांदावी; मेरी कोम यांनी घेतले साई दर्शन

मणिपुरमध्ये शांतता नांदावी; मेरी कोम यांनी घेतले साई दर्शन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

भारतात सर्व धर्म आहेत, मणिपुरमध्ये (Manipur) शांती नांदावी, प्रत्येक धर्मातील नागरिकांनी आपल्या विकासासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी भारत सरकारने मदत करावी, प्रत्येक धर्मातील व्यक्तींनी परस्परांना सहकार्य, प्रेम करावे अशी भावना भारताची ऑलिम्पिक पदक विजेती व राज्यसभेच्या माजी खा. मेरी कोम (Mary Kom) यांनी साई दरबारी व्यक्त केली.

- Advertisement -

महिला बॉक्सर मेरी कोम (Female Boxer Mary Kom) हिने रविवारी सायंकाळी साई मंदिरात (Sai Temple) हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मेरी कोम यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेरी कोम प्रथमच साईबाबांच्या दर्शनासाठी (Sai Baba Darshan) शिर्डीत आल्या होत्या. साई दर्शनानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना त्या म्हणाल्या, शिर्डीला (Shirdi) येऊन खूप आनंद झाला. लहानपणी मी साईबाबांबद्दल खूप ऐकले होते. टीव्हीवर बघितले होते, पण मला त्यांच्याविषयी अधिक माहिती नाही.

दिल्लीत (Delhi) ट्रेनिंगसाठी असताना मी साईबाबांचे मंदिर पाहिले होते, तेव्हापासून मला शिर्डीला (Shirdi) यायचे होते. आज माझ्या एका व्यावसायिक मित्राने मला येथे आणले आणि साईबाबांचे दर्शन (Sai Baba Darshan) घडवले. इथे येऊन खूप सकारात्मक आणि शांत वाटले. मी खूप मेहनती आहे आणि बॉक्सिंगमध्ये माझ्यासारखी मेहनत कोणी करू शकत नाही. मी जे ठरवते ते करतेच. कोणत्याही स्पर्धेत यश मिळवण्यासाठी खेळाडूंनी कठोर परिश्रम करणे आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मेरी कोम यांनी सांगितले. यावेळी अनेक साईभक्तांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांना बघण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या