Friday, May 3, 2024
Homeनाशिकइगतपुरी : वारीसाठी जतन केलेल्या पैशातून वितरीत केले मास्क

इगतपुरी : वारीसाठी जतन केलेल्या पैशातून वितरीत केले मास्क

नाशिक : करोना व्हायरसच्या उद्रेकाचा परिणाम फक्त सामान्य जीवनावरच झाला नाही, तर भक्ती जीवनावरही त्याचा परिणाम झाला. इतिहासात प्रथमच पंढरपूरची वारी रद्द केली गेली आणि केवळ निवडलेल्या लोकांना पालखीस परवानगी होती. बर्‍याच वर्षांची परंपरा तुटल्याने वारकरी अस्वस्थ झाले. पण, ९० वर्षांच्या वारकरी या आजीने एक अनोखे उदाहरण उभे केले आहे.

इगतपुरी तालुक्याच्या घोटी गावातील चंद्रभागा किसन पुणेकर या ९० वर्षांच्या आजीने निराश होण्याऐवजी लोकांना प्रेरणादायक धडा दिला. यावर्षीचा पंढपूर वारीसाठी ठेवलेल्या बचतीतून आजीने मास्क वितरित केले आहे. करोनाव्हायरस किंवा कोविड -१९ च्या उद्रेकामुळे वारी रद्द झाल्याने परिस्थितीला दोष देण्याऐवजी आजीने जमा केलेल्या ५ हजार रुपयांमधून आतापर्यंत २५० मास्क वाटून समाजाची सेवा केली.

- Advertisement -

साल १९६४ पासून आजी चंद्रभागा पुणेकर वारीसाठी जात आहेत. तेव्हापासून त्यागेल्या ५६ वर्षात कधीच वारी चुकली नव्हती. पण यावर्षी कोविड -१९ च्या उद्रेकामुळे वारीला अडचणीत आणले. आजी खूप सक्रिय आहेत आणि अजूनही विठ्ठलाची भजन आणि ओवी गातात.

आजीने आपल्या नातवाना सांगितले की ती वारीसाठी ठेवलेल्या पैशातून काहीतरी करण्याचा विचार करीत आहे. त्यानुसार, तिच्या नातवानी त्यांना मास्क वितरित करण्यास सूचविले. आपल्या नातवांच्या मदतीने आजीने मास्क खरेदी केले आणि त्यांना सरकारी कार्यालयांमध्ये आणि गरजूंना वाटप करण्यास सांगितले. आजीला ४ मुले, ५ नातवंडे आणि ७ पन्तू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या