Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभीषण दुर्घटना! फटाक्यांच्या कारखान्यात प्रचंड स्फोट; १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांचा आकडा...

भीषण दुर्घटना! फटाक्यांच्या कारखान्यात प्रचंड स्फोट; १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भिती

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील वेतलापलेम गावामध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एक फटाखा फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती, आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालापुडी अनीता यांनी या घटनेची माहिती देताना व्यक्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील वेतलापलेम गावामध्ये दुपाराच्या सुमारास ही घटना घडली. एका फटाका उत्पादक कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, अख्ख गाव हादरले. गृहमंत्री वंगालपुडी अनिता यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला असून स्फोटामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या स्फोटामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, जिल्हा दंडाधिकारी सगीली शान मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटातील जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. अधिकृत माहितीनुसार, स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात सुमारे २० जण काम करत होते.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताचा घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी स्फोटाच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रशासनाला तातडीने मदत कार्य करण्याची सूचना केली आहे. ज्या फटाखा उत्पादक कंपनीमध्ये हा स्फोट झाला त्या कंपनीमध्ये २० जण काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे.

स्फोटाची माहिती मिळताच शेजारी गावातील लोकांनी घटनाास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत ते म्हणाले, “वेत्लापलेम गावातील फटाका कारखान्यात झालेली ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे.” त्यांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून बचावकार्याचा आढावा घेतला आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, सरकार प्रभावित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

बहुमताचा

TVK Vijay: मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; बहुमताचा आकडा पार,...

0
तामिळ नाडू | Tamil Naduदेशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्तास्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. टीव्हीके पक्षाला व्हीसीके पक्षाने...