Saturday, July 25, 2026
Homeक्राईमCrime News : मावा तयार करणार्‍या दोन कारखान्यांवर छापा

Crime News : मावा तयार करणार्‍या दोन कारखान्यांवर छापा

नगर शहरात एलसीबीची कारवाई || लाखाचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील तपोवन रस्ता, सूर्यनगर परिसरात घरातून अवैधरित्या मावा तयार करून त्याची विक्री करणार्‍या दोन ठिकाणांवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रविवारी (12 जुलै) पहाटे कारवाई केली. या कारवाईत सुमारे 99 हजार 700 रूपयांचा सुगंधित तंबाखू, तयार मावा, बारीक सुपारी, मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक व लोखंडी मशीन तसेच प्लास्टिकच्या पुड्यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्यासह अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, मनोज साखरे, सतीश भवर, भगवान धुळे, भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाला माहिती मिळाली होती की, तपोवन रस्त्यालगतच्या सूर्यनगर येथील एस.टी. कॉलनी परिसरात सचिन दिलीप पवार (वय 40) आणि राहुल नवनाथ गिते (वय 30) हे त्यांच्या राहत्या घरात मशीनच्या साहाय्याने विक्रीस प्रतिबंधित असलेला मावा तयार करून विक्री करत आहेत. या माहितीची खातरजमा करून पथकाने दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला.

छाप्यादरम्यान दोघेही मावा तयार करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित मावा, तयार मावा, बारीक सुपारी, मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक व लोखंडी मशीन तसेच प्लास्टिकच्या पुड्या असा एकूण 99 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Onion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

0
नेवासा | Newasa येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 55 हजार 373 गोण्या आवक झाली. भाव 2700 रुपयांपर्यंत...