Tuesday, August 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमाझगावमध्ये गणपती आगमानावेळी तणाव; अंडी फेकल्याच्या आरोपानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

माझगावमध्ये गणपती आगमानावेळी तणाव; अंडी फेकल्याच्या आरोपानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील माझगाव परिसरात गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान रविवारी रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ‘माझगावचा मोरया’ गणपतीच्या आगमन सोहळ्यात अंडी फेकण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर वातावरण चिघळले आणि दोन गट आमनेसामने आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गणपती आगमनावेळी नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, माझगावचा मोरया गणपतीच्या आगमनाची मिरवणूक सुरू असताना जवळच्या एका इमारतीतून मिरवणुकीच्या दिशेने अंडी फेकण्यात आल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. ही घटना गणपती मंडपापासून अंदाजे ३० ते ४० मीटर अंतरावर घडल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

अंडी फेकल्याची माहिती परिसरात पसरताच गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर वाद वाढला आणि दोन गटांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काही काळ परिसरात मोठी गर्दी झाली होती.

व्हेंटिलेटरचा स्फोट अन् NICU मध्ये आग; अमरावतीत तीन नवजात बालकांचा मृत्यू

पोलिसांचा मोठा बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती आणखी चिघळू नये आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अंडी नेमकी कोणी आणि कोणत्या इमारतीतून फेकली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

संशय व्यक्त केला, मात्र पोलिसांकडून तपास सुरू
गणेश मंडळ आणि भक्तांकडून परिसरातील एका इमारतीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अंडी नेमकी त्याच इमारतीतून फेकण्यात आली का, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. परिसरात तीन-चार मोठ्या इमारती असल्याने पोलिस सर्व शक्यता तपासत आहेत. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होणार आहे.

गणेश मंडळाची कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधितांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मंडळाकडून करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

हिजाब

‘हिजाब न घातल्याने धर्म धोक्यात येत नाही’; शालेय विद्यार्थिनीची याचिका फेटाळली,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiशाळेच्या गणवेशासोबत हिजाब किंवा डोक्यावर स्कार्फ घालण्याची परवानगी मागणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनीच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे....