Monday, August 3, 2026
HomeनगरCrime News : मोक्का कारवाईनंतरही विजय पठारेसह तिघे फरार

Crime News : मोक्का कारवाईनंतरही विजय पठारेसह तिघे फरार

जिल्हा न्यायालयाचे अटक वॉरंट जारी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणार्‍या विजय राजू पठारे टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतरही टोळीप्रमुख विजय पठारेसह तिघे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हा व सत्र न्यायालयाने संबंधित आरोपींविरूध्द अटक वॉरंट जारी केले असून त्यांना तत्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांनी विशेष मोक्का प्रकरणात हे अटक वॉरंट जारी केले आहे.

- Advertisement -

या आदेशानुसार तोफखाना पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वॉरंट काढण्यात आलेल्या आरोपींमध्ये टोळीप्रमुख विजय राजू पठारे, अजय राजू पठारे आणि सनी रणजित चावरे (सर्व रा. सिध्दार्थनगर, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. टोळीतील दोघांना अटक करण्यात आलेली आहे. 15 मार्च 2026 रोजी फिर्यादी, त्यांचे पती, मुलगा, सून आणि नातू यांच्यावर विजय पठारेच्या नेतृत्वाखालील टोळीने लोखंडी कोयता, तलवार आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात संबंधितांना गंभीर दुखापत झाली होती. या घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास केला. त्यामध्ये विजय पठारे आणि त्याच्या टोळीविरूध्द तोफखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न, मारहाण, दहशत निर्माण करणे, खंडणीसह विविध गंभीर स्वरूपाचे एकूण 12 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तोफखाना पोलिसांनी आरोपींविरूध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सादर केला होता. छाननी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांनी विजय पठारे, अजय पठारे, किरण जेधिया, सनी चावरे आणि नीलेश ससाणे या पाच आरोपींविरूध्द मोक्का कायद्याची वाढीव कलमे लागू करण्यास मंजुरी दिली. मोक्का लागू झाल्यानंतर न्यायालयाने संबंधित आरोपींविरूध्द अटक वॉरंट जारी केले आहे.

ताज्या बातम्या

Shani Shingnapur : शनैश्वर देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक चौकशी सुरु

0
शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shingnapur श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील 1 जानेवारी 2020 ते 2025 या कालावधीतील आर्थिक व्यवहारांचे फॉरेनसिक लेखापरीक्षण केले जाणार असल्याची माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी...