Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDelhi Meeting : कांदा, साखर उद्योगाबाबत आज दिल्लीत बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही...

Delhi Meeting : कांदा, साखर उद्योगाबाबत आज दिल्लीत बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, काय तोडगा निघणार?

मुंबई | Mumbai

राज्यात कोसळलेले कांद्याचे दर (Onion Rate) आणि साखर उद्योगासमोरील अडचणींबाबत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आज (दि. २७) रोजी सायंकाळी ५ वाजता बैठक बोलवली आहे. केंद्र सरकारला कांदा आणि साखर उद्योग यावर बैठक घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आज दिल्लीत ही बैठक होत आहे.

- Advertisement -

सोमवारी केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव साडेतीन रूपयांनी वाढवून १५ रूपयांवर नेला होता. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार (State Government) संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी म्हटले होते. यावेळी कांदा प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाची फडणवीस यांनी खिल्ली उडवली होती. कांदा कापल्यानंतर ज्यांच्या डोळयात अश्रू येत नाहीत, अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे केवळ फोटो संधीसाठी चालले असल्याचा फडणवीस म्हणाले होते.

राज्य आणि केंद्र सरकार हस्तक्षेप करत आहे. काही लोक विनाकारण यात राजकारण करत आहेत. त्यांना आपले इतकेच सांगणे आहे की, राज्य-केंद्राने १५ रूपयाचा निर्णय घेतला आहे. तुमच्या काळात कधी हा निर्णय केला होतात का, आम्ही घेतला. कारण आम्ही संवेदनशील आहोत. आजच्या केंद्रासोबतच्या बैठकीत (Meeting) कांद्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना येतील, असा विश्वासही फडणवीस यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला होता.

दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले, आमदार दिलीप वळसे -पाटील, जयंत पाटील, विनय कोरे, अभिमन्यू पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...