Saturday, April 25, 2026
HomeनाशिकNashik News: सिंहस्थासाठी तपोवनातील जागा अधिग्रहणावर मंगळवारी मुंबईत बैठक

Nashik News: सिंहस्थासाठी तपोवनातील जागा अधिग्रहणावर मंगळवारी मुंबईत बैठक

नाशिक | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थासंदर्भात तपोवन परिसरातील जागा अधिग्रहणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संत-महंतांचे आखाडे आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या सेवेकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या जागांची सोडवणूक करण्यासाठी मंगळवारी मुंबईत मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक राज्याचे प्रधान सचिव अश्विनी भिडे यांच्या दालनात होणार आहे. अधिग्रहण प्रक्रियेतील प्रत्यक्ष अडचणी, मोबदल्याचे स्वरूप आणि निधीची आवश्यकता यावर सखोल चर्चा केली जाणार आहे.

सिंहस्थ २०२७ मध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका व राज्य शासनाने नियोजन सुरू केले आहे. तपोवन हे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाचे क्षेत्र असल्याने तेथे आखाड्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पूर्वीच्या नोटिफाईड जागांचे अद्याप अधिग्रहण बाकी असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. या जागा फक्त दोन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घ्याव्यात की थेट अधिग्रहीत कराव्यात, यावरदेखील निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisement -

मोबदल्यासाठी टीडीआर (ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राईट्स) देण्याचा पर्याय विचाराधीन असून, त्याची टक्केवारी निश्चित केली जाणार आहे. काही जागांमध्ये ५० टक्के भूविकास करून जागा मालकांना परत बैठकीत आहेत. मांडले जाणार देणे यासारखे पर्यायदेखील तपोवन परिसरातील जागा हा सिंहस्थाच्या नियोजनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जागेच्या मोबदल्याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट झाल्यास पुढील टप्प्यातील अधिग्रहण प्रक्रिया गती घेईल. त्यामुळे मंगळवारची ही बैठक जागा अधिग्रहणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या