नाशिक, दिनांक 8 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) :
नाशिक जिल्ह्यात सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड तालुक्यातील काही ठिकाणी आज सुमारे 10 वाजून 1 मिनिटांनी भूकंपचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नागरिकांनी अजिबात घाबरू नका, कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्वांनी फक्त सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहेत.
त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहेत की, सतर्क राहण्यासाठी आपण ज्या बिल्डिंगमध्ये आहे, त्या बिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारची क्रॅक आली आहे का, किंवा कुठल्याही प्रकारची धोका आहे का, याचे एक निरीक्षण करा. जर कुठल्याही प्रकारची धोका असेल, तर स्थानिक प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायत, किंवा महानगरपालिकेशी ताबडतोब संपर्क साधा. आणि त्या बिल्डिंगमध्ये अजिबात राहू नका.
तसेच कुठलाही जो लँडस्लाइड प्रोन एरियाज असेल, विशेषतः घाट परिसरमध्ये, ज्या ठिकाणी लँडस्लाइड होण्याची शक्यता असेल, त्या ठिकाणी जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचे क्रॅक्स वगैरे पडून आहे की नाही, त्याच्याबद्दल एक निरीक्षण करा. दुसरी गोष्टी, त्या जमिनीखाली पाणी वाहतेय का, पाण्याचा आवाज येत आहे का, त्याचे आपण निरीक्षण करा. जर अशी परिस्थिती असेल, तर सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावे. त्याच्यासाठी स्थानिक प्रशासनाशी आपण संपर्क करा. प्रशासन पूर्णतः सतर्क आहे. कुठल्याही प्रकारची नुकसानची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेली नाही. आपण सगळ्या ठिकाणी निरीक्षणचे आदेश दिलेले आहेत. सर्वांनी आपल्या आपल्या घराचे निरीक्षण करून घ्या, आणि कुठल्याही प्रकारचे धोकादायक परिस्थिती असेल, तर आपण आपले स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेशी ताबडतोब संपर्क साधावा.
घाबरण्याचे काही कारण नाही, परंतु सतर्क राहण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी म्हटले आहेत.
नाशिक जिल्ह्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत
दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास (२२:००:५९ IST) नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) वरील नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी नोंदविण्यात आली असून, मेरी, नाशिक येथून प्राप्त माहितीनुसार तीव्रता ४.१ Mg. इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर होता. प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
तथापि, संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. विशेषतः कच्चे बांधकाम (दगड-मातीचे बांधकाम) असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना / आवाहन:
१. जिल्हा प्रशासन व स्थानिक महसूल यंत्रणा संबंधित तालुक्यांशी संपर्क आहेत.
२. नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
३. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, सोशल मीडियावरील (व्हॉट्सॲप, फेसबुक इ.) कोणतीही असत्यापित माहिती किंवा संदेश पुढे प्रसारित करू नये. नागरिकांनी केवळ प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीची व सूचनांचीच नोंद घ्यावी.
४. आवश्यकता भासल्यास नागरिकांनी नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस पाटील, तलाठी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.




