मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीमध्ये (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळण्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी आमचं सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रुपये देऊ असे सांगितले होते. गेल्या पाच महिन्यात कोट्यवधी लाभार्थी महिलाना या योजनेचे ७ हजार ५०० रुपये मिळाले आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींचे पुढील हप्ता कधी मिळणार? याकडे लक्ष लागून होते. अशातच आता डिसेंबरच्या हप्त्याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत महत्त्वाची माहिती दिली आहे.
आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी पोस्ट करत म्हटले की, “महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे (Code of Conduct) थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.
ही योजना का विशेष आहे?
१) आर्थिक आधार: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार.
२) सन्मानाचा भाव: केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे.
३) सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो.
मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल अशी आशा आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.
डिसेंबरच्या हप्त्यासाठी ३५०० कोटी रुपयांची तरतूद
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या (Women) खात्यात वर्ग करण्यात आली होती.जुलै ते नोव्हेंबर पर्यंत १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. त्यानंतर आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.
महिलांना १५०० रुपये मिळणार की २१००?
राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आले तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रुपये देऊ असं आश्वासन नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. त्यानुसार २१०० रुपये कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांच्या मनात आहे. मात्, या डिसेंबर महिन्यात पूर्वीप्रमाणेच १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असून २१०० रुपये मिळण्यासाठी त्यांना आणखी वाट पहावी लागणार आहे. अर्थसंकल्पात (Budget) त्याची तरतूद करण्यात येणार असून पुढल्या वर्षी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यात २१०० रुपये जमा होतील, असे सांगण्यात येत आहे.
‘
.