Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान; मंत्री भुजबळांकडून मदतीचा हात, केली मोठी...

Chhagan Bhujbal : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान; मंत्री भुजबळांकडून मदतीचा हात, केली मोठी घोषणा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संपूर्ण जिल्ह्यासह येवला तालुक्यात (Yeola Taluka) मुसळधार पावसाने (Rain) शेतकऱ्यांचे (Farmer) कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागा, कांदा आणि सोयाबीनच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची घोषणा केली आहे. “शेतकऱ्यांसाठी जे शक्य आहे ते सर्व करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

- Advertisement -

मंगळवारी (दि.२३) मुंबईहून येवल्याकडे रवाना झालेले मंत्री छगन भुजबळ गुरुवारी (दि.२५) अतिवृष्टीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. राज्य सरकारने (Sate Government) २,२१५ कोटींची मदत जाहीर केली असून, ३१.५४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यंदाच्या पावसाने १५० गावे प्रभावित झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, भुजबळ यांनी शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते आणि आर्थिक मदतीच्या विशेष योजना जाहीर करण्याचे संकेत दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे (District Administration) किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

महिला टी-20 विश्वचषक २०२६ : भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय

0
महिला टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६४ धावांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेतील मोहिमेची दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर झालेल्या या...