Friday, July 24, 2026
Homeक्राईमAhilyanagar : आरोपीच्या घरझडतीत मिळाले पाच ग्रॅम मेफेड्रोन

Ahilyanagar : आरोपीच्या घरझडतीत मिळाले पाच ग्रॅम मेफेड्रोन

सावेडी ड्रग्ज प्रकरण || मुख्य संशयित पोलिसांना सापडेना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील मिस्किनमळा परिसरातून जप्त केलेल्या 150 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) प्रकरणातील संशयित आरोपीच्या घराची तोफखाना पोलिसांनी गुरूवारी (23 जुलै) झडती घेतली. एका संशयिताच्या घरामध्ये आणखी पाच ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले आहे. ते पोलिसांनी पंचनामा करून जप्त केले आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य संशयित जमीर शेख व त्याचा साथीदार अद्याप पसारच आहे.

- Advertisement -

रविवारी (19 जुलै) तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक सावेडी परिसरात गस्त घालत असताना मिस्किनमळा येथे एक कार संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी या कारमधील झिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान यांना ताब्यात घेतले. तर, जमीर शेख व त्याचा साथीदार पसार झाला आहे. कारमध्ये सुमारे 150 ग्रॅम मेफेड्रोन, दरोड्याचे साहित्य मिळून आले. तिघांच्या चौकशीत आणखी तिघांची नावे समोर आले.

त्यांच्याकडून मुकुंदनगरसह अहिल्यानगर शहरात ड्रग्ज विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांना अटक करण्यात आली. अली शेख, दानिश शेख, कासिफ खान अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, अटकेतील सहा जणांच्या पोलीस कोठडीची मुदत आज (शुक्रवार) संपत आहे. तत्पूर्वी काल (गुरूवारी) पोलिसांनी संशयित दानिश शेख याच्या मुकुंदनगर येथील घराची झडती घेतली. त्याच्या घरात आणखी पाच ग्रॅम मेफेड्रोन मिळून आले ते पंचनामा करून जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Crime News : एलसीबीचे जुगार, बिंगो व अवैध दारू अड्ड्यांवर छापे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई करत एमआयडीसी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार, बिंगो आणि अवैध दारू व्यवसायावर एकाच...