Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDattatray Bharne: कृषीमंत्रीपद मिळताच मंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, एका शेतकऱ्याच्या...

Dattatray Bharne: कृषीमंत्रीपद मिळताच मंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, एका शेतकऱ्याच्या मुलाला…

मावळ | Maval
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महायुतीच्या मंत्रीमंडळात फेरबदल करण्याची नामुष्की ओढावली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण हे जबाबादारी स्वीकारल्यानंतर कृषिमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दत्ता भरणे यांना कृषिमंत्रिपदाची लॉटरी लागल्यानंतर इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष करण्यात आला. त्यांनी बारामतीचे नाव घेत पहिला फैसला पण जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे इंदापूरकरांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

नेमकं काय म्हणाले दत्तात्रय भरणे?
आज सकाळीच ही आनंदवार्ता मिळाल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले. या सर्वांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकल्याचे ते म्हणाले. एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खाते मिळते, यापेक्षा दुसरा कुठला आनंद असू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कृषी खात्याच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, शेतकऱ्यांच्या शेतीत नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येतील यावर माझा भविष्यात भर राहणार आहे, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.

- Advertisement -

कर्जमाफी बद्दल नेमकं काय म्हणाले?
कृषी खात्याचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खाते बदल करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. आता कर्जमाफीची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, अजून या खात्याचा आपण पदभार स्वीकारला नाही. कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ही मंडळी योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचे दुःख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात
शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे दत्ता भरणे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

IPL 2026 : आज मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्जमध्ये लढत; कुणाची बाजू...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून,अंतिम चार मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सर्व १० संघांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू...