Thursday, May 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManikrao Kokate: कृषीमंत्रीपदावरुन उचलबांगडी होताच माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया; म्हणाले, I AM Very…

Manikrao Kokate: कृषीमंत्रीपदावरुन उचलबांगडी होताच माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया; म्हणाले, I AM Very…

पुणे | Pune
विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषीमंत्री असणार आहेत. या खातेबदलानंतर आता माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल सुरू असणार आहे. दुसरीकडे दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत. ते मोठे आणि जाणकार शेतकरी आहेत, त्यांच्याकडे हे खाते सोपवले आहे. त्यामुळे या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल. त्या खात्यात त्यांना गरज पडली आणि त्यांनी माझ्याकडे काही मदत मागितली तर मी १०० टक्के त्यांना मदत करेन,” असे माणिकराव कोकाटे म्हणाले आहे. तसेच नवीन खाते आवडले का?, असे विचारताच I AM VERY HAPPY, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

- Advertisement -

“जे खाते माझ्याकडे देण्यात आले आहे, त्यामध्ये दत्ता मामा भरणे यांची काही गरज पडली तर मी त्यांचा सल्ला देखील घेईन आणि अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेन,” असे माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळेंची टीका
माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलताच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाच्या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “जी काही घटना घडली त्यानंतर मोठा रोष होता, त्याबद्दल अजित पवार आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे. त्यांचे खाते बदलेले आहे आणि त्यांना दुसरे खाते दिले आहे. कृषी खाते मामा भरणे यांना दिले आहे.” या बदालसह अजून मंत्रिमंडळात काही बदल होतील का? याबद्दल विचारले असता फडणवीस यांनी “आत्तातरी दुसरा कुठला बदल होईल अशी चर्चा नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संजय

Sanjay Raut: “आया-बहिणींचे कपडे फाडून…”; रिंग रोडच्या भूसंपादनावरुन संजय राऊत आक्रमक,...

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिकच्या रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादनादरम्यान महिलांना झालेल्या मारहाणीचे पडसाद आता जिल्हाधिकारी कार्यालयात उमटले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...