Thursday, September 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNarhari Zirwal: स्टिंग एनर्जी ड्रिंकवर विधान भवनात चर्चा, मंत्री नरहरी झिरवाळांचा मोठा...

Narhari Zirwal: स्टिंग एनर्जी ड्रिंकवर विधान भवनात चर्चा, मंत्री नरहरी झिरवाळांचा मोठा निर्णय, शाळांच्या ५०० मीटर परिसरात…

मुंबई | Mumbai
गेल्या काही काळात स्टिंग एनर्जी ड्रिंक हे शितपेय तरुणांसोबत लहान मुलांमध्येही कमालीचे लोकप्रिय झाले आहे. एनर्जी ड्रिंक म्हणून हे पेय तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. या पेयाबाबत उलट सुलट चर्चाही होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने स्टिंग एनर्जी ड्रिंकबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये आता स्टिंग पेय विक्रीसाठी बंदी असणार आहे. असे आदेश अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहे.

स्टिंग एनर्जी ड्रिंगमुळे आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होत आहे. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्टिंग या एनर्जी ड्रिंकचे सेवन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी या पेयाबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. तसेच मुलांना या पेयाची चटक लागते. हे पेय लहान मुले आणि गरोदर महिलांसाठी पिण्यास अयोग्य असल्याचे या पेयाच्या कॅनवर नमुद केलेले असते, तरी ही हे पेयाचे मोठ्या प्रमाणावर सेवन करण्यात येत आहे, अशी माहितीही पाचपुते यांनी दिली.

- Advertisement -

यावर स्टिंग हे शाळेच्या आवारात हे विकले जातेय हे मान्य आहे. शाळांच्या ५०० मीटरच्या आत अंमली पदार्थांसह स्टिंग एनर्जी ड्रिंकवरही बंदी घालू, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.

Nashik News: जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैत दमदार पावसाची अपेक्ष, गंगापूर धरणसमूह साठ्यात ‘इतके’ टक्के तूट

अनेक पेय उर्जा देण्याच्या नावाखाली शाळा परिसरात फ्लेवर पानाखाली अंमली पदार्थ विक्री होते, चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार राहुल कुल यांनी केली. तसेच दुध भेसळ फ्लेवर मिल्क नावाखाली विक्री होते, जास्त साखर, कृत्रिम द्रव्य वापर होतो, याचीही चौकशी केली जावी, असे राहुल कुल म्हणाले. यावर तुकाराम मुंढे यांच्या अंतर्गत तपासणी सुरू आहे, अशी माहिती नरहरी झिरवळांनी विधानसभा सभागृहात दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकार बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 नाव्हेेंबरला मतदान प्रक्रिया पार पडून 3 नाव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत प्रारूप निवडणूक...