Friday, May 3, 2024
Homeनगरना. तनपुरे यांनी घेतला पाणीपुरवठा योजनांचा आढावा

ना. तनपुरे यांनी घेतला पाणीपुरवठा योजनांचा आढावा

राहुरी (तालुका प्रतिनिधी) / Rahuri – मुळा डॅम विश्रामगृहावर ना. प्राजक्त तनपुरे यांनी जनजीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी मिरी तिसगांव पाणीपुरवठा योजना, बुर्‍हानगर पाणीपुरवठा योजना, 14 गाव पाणीपुरवठा योजना, कुरणवाडी व इतर गाव पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला.

यावेळी थकीत वीज बिला संदर्भात चर्चा करण्यात आली.थकीत वीजबिलासाठी योजनाधारकांनी लवकरात लवकर वीजबिल भरुन योजना सुरळीत करण्याच्या सूचना ना. तनपुरे यांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत झालेल्या चर्चेत कामांचा आढावा घेण्यात आला. शासनाच्या स्थानिक विकास निधी, जिल्हा नियोजन निधी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संदर्भात चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन अडचणी समजावून घेतल्या.

- Advertisement -

केंदळ खुर्द, मानोरी मुळा नदीवरील बंधार्‍याच्या पुलाचा प्रश्‍न येत्या काही दिवसात सुटणार आहे. या कामाचा प्रस्ताव जलसंपदा विभाग, नाशिक येथे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. येथील पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्‍न कायमचा सुटणार असून केंदळ व मानोरी येथील ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी दळणवळणाचा प्रश्‍न निकाली निघणार आहे.

बैठकीस जि. प. सदस्य धनराज गाडे, भास्कर गाढे, पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, सुरेश निमसे, बाळासाहेब लटके, प्रदिप पवार, अविनाश ओहोळ, मिरी योजनेतील पदाधिकारी काशिनाथ लवांडे, जालिंदर वामन, रवींद्र मुळे, बुर्‍हाानगर योजनेतील गोविंद अण्णा मोकाटे, अ‍ॅड.अभिषेक भगत, कुरणवाडी योजनेतील सुयोग नालकर, अमोल भनगडे, चौदा गांव योजनेतील सुनील मोरे, बाळासाहेब खुळे,

सचिन भिंगारदे, जि.प.चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, संतोष आघाव, धिरज पानसंबळ, मुळा पाटबंधारे विभागाच्या अभियंता सायली पाटील, राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर, पाथर्डी गटविकास अधिकारी शितल खिंडे, नगर गटविकास अधिकारी धाडगे, नगरचे ग्रामिण पाणीपुरवठा अधिकारी प्रविण जोशी, पाथर्डीचे अनिल सानप, जि.प. कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, पोपटराव भणगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे परदेशी, जोशी, चव्हाण, पवार, सार्वजिक बांधकाम विभागाचे अभियंता व पंचायत समिती अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, पाणी योजनेचे सर्व सचिव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या