मीरा भाईंदर | Mira Bhayandar
मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीने मोर्चाची हाक दिल्यानंतर मनसे आणि शिवसेना उबाठा पक्षाने या मोर्चास पाठिंबा देत आज सहभागही घेतला. त्यामुळे, या मोर्चाला विराट स्वरुप प्राप्त झाले आहे. मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मारहाणाच्या विरोधात मोर्चा काढला होता, या मोर्चानंतर आता मराठी अस्मिता आणि मराठीच्या मुद्द्यावरुन मीरा भाईंदरमध्ये मराठीजन एकत्र आले असून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिल्याने मोठा पोलीस बंदोबस्त मोर्चाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेल्या धरपकड कारवाईवर संताप व्यक्त करत शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी झाले. पण, मोर्चाच्या ठिकाणी येताच त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना पाण्याची बॉटल फेकून मारण्यात आली. त्यानंतर प्रताप सरनाईक मोर्चातून निघून गेले. या घटनेनंतर सरनाईकांनी उबाठा आणि मनसेवर टीका केली.
यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते. प्रताप सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी मी मराठी लिहिलेली गांधी टोपी परिधान करुन ते मोर्चात आले. पण त्यांना तिथे नकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रताप सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी येताच जय गुजरातच्या घोषणा देण्यात आल्या. गो बॅक… गो बॅक… प्रताप सरनाईक गो बॅक… अशी सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली. प्रताप सरनाईक यांच्यासमोर यांच्यासमोर ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आल्या. प्रताप सरनाईकांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला. आंदोलनकर्त्यांनी सरनाईक गो बॅक अशा घोषणाही देण्यात आल्या. जय गुजरात म्हणत आंदोलनकर्त्यांनी सरनाईकांना डिवचले.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मी जेव्हा मीरा भाईंदरच्या हद्दीत प्रवेश करतो, तेव्हा माझ्या तोंडून हिंदीच निघते, असे सरनाईक यांनी त्या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते. त्यामुळे, मराठी एकीकरणासाठी निघालेल्या या मोर्चातील आंदोलकांनी प्रताप सरनाईक यांच्या सहभागाला थेट विरोध दर्शवला. त्यानंतर, प्रताप सरनाईक माघारी फिरले असून अधिवेशनासाठी मुंबईला गेले.
पत्रकारांनी त्यांना विचारले, तुम्ही आल्यावर जय गुजरातच्या घोषणा दिल्या. त्यावर प्रताप सरनाईक म्हणाले की, “राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. माझ्यासोबत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहेत. त्यामुळे बाकीच्यांना जे काय राजकारण करायचय ते करु दे. प्रताप सरनाईक मीरा-भाईंदरमधील मराठी जनांच्या पाठिमागे ठामपणे उभा आहे” असे म्हणले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




