Saturday, April 4, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत पर्यटनातून रोजगार निर्मितीस प्राधान्यक्रम - ना. विखे पाटील

Shirdi : शिर्डीत पर्यटनातून रोजगार निर्मितीस प्राधान्यक्रम – ना. विखे पाटील

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन आगामी काळात शिर्डी नगरीचे रूपांतर अध्यात्मिक कॉरिडॉरमध्ये करावे लागणार आहे. स्थानिक नागरिक आणि येणार्‍या भाविकांसाठी अधिक सुविधा निर्माण करून देतानाच, पर्यटनातून रोजगार निर्मिती हा प्राधान्यक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना. विखे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. बैठकीला माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, शिवाजीराव गोंदकर, भाजपचे राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष रविंद्र गोंदकर, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शिवसेनेचे विजयराव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब कोते, रमेश गोंदकर, निलेश कोते, अलकाताई शेजवळ, अनिल शेजवळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. विखे पाटील यांनी नगरपंचायत ते नगरपरिषदेच्या झालेल्या प्रवासाचा विस्ताराने उल्लेख करून सांगितले, काळाच्या ओघात शहराची लोकसंख्या वाढली आहे. साईबाबांच्या नगरीत येणार्‍या भाविकांची संख्या देखील वाढली आहे. भविष्याचा विचार करून शहराचा विकास अधिक नियोजनाने करावा लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशातील सर्वच अध्यात्मिक नगरीचे स्वरूप बदलत आहे. त्याच धर्तीवर शिर्डीची ओळख एक अध्यात्मिक नगरी म्हणून होण्यासाठी आपला प्रयत्न आहे. राज्य सरकारचे सहकार्यही यास मिळणार असून विविध विकास प्रकल्प कार्यान्वित करून येथे अध्यात्मिक पर्यटन वाढविण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले. मध्यंतरीच्या काळात शहरातील गुन्हेगारी विरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळेच परिस्थिती बदलली. आध्यात्मिक नगरी अशीच ओळख शहराची राहावी, असा प्रयत्न असून येणार्‍या भाविकांसाठी थीम पार्कचा प्रकल्प उद्योजकांच्या भागीदारीने कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अशी एकजूट ठेवली तर मोठे यश आपलेच आहे.

विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी केलेल्या चांगल्या कामामुळे ऐतिहासिक विजय मिळाला. राज्यातही महायुतीचे सरकार आले. जनतेच्या मनातील सरकार असल्याने सामान्य माणसाच्या हितासाठी निर्णय होत आहेत. एकही योजना राज्य सरकारची बंद झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक दृष्टीने मजबूत होत आहे. अमेरिकेने आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरी देश आत्मनिर्भरतेने करत असलेली वाटचाल ऑपरेशन सिंदूरमुळे जगाला दिसून आली असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले. कैलास कोते, अभय शेळके, विजय जगताप, शिवाजीराव गोंदकर, राजेंद्र गोंदकर, रविंद्र गोंदकर यांनी मनोगत व्यक्त करून निवडणुकीच्या दृष्टीने सूचना केल्या.

शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक येऊ लागल्याने मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गणेश निबे यांच्या संरक्षण विषयक उत्पादनाची सुरूवात फेब्रुवारीमध्ये होणार असून, प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आयटीआय प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना येथे संधी आहे. टाटा उद्योग समूह प्रशिक्षण केंद्र उभारत आहे. शासकीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन 2 नोव्हेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.
– ना. राधाकृष्ण विखे पाटील

ताज्या बातम्या

Baramati By-Election : बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कुणाला? समोर आली मोठी...

0
मुंबई । Mumbai राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. ही निवडणूक बिनविरोध पार...