Friday, May 3, 2024
Homeनगरहरवलेल्या अल्पवयीन मुलाची 12 तासांत सुटका

हरवलेल्या अल्पवयीन मुलाची 12 तासांत सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रनिंगसाठी बाहेर पडलेला अल्पवयीन मुलगा घरी परत आला नाही. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत फिर्याद दाखल होताच पोलिसांनी 12 तासांत त्या मुलाचा शोध घेवून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. शिक्षक अजिनाथ सुदामा केंदळे (वय 37 रा. साईराम सोसायटी, नगर-कल्याण रोड, अहमदनगर) यांचा पुतण्या ओमकार भाऊसाहेब केंदळे (वय 16) व त्यांच्या गल्लीत राहणारा राम गणेश सोनवणे (वय 16 वर्षे) हे दोघे 18 मार्च रोजी सकाळी रनिंग करण्यासाठी घरातून निघून गेले.

- Advertisement -

ते परत आले नाहीत. त्यांचा शोध घेतला असता 19 मार्च रोजी सायंकाळी राम सोनवणे हा पुणे बस स्थानक येथे मिळून आला. परंतु ओमकार मिळून न आल्याने अजिनाथ केंदळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस अंमलदार देविदास आव्हाड, साईनाथ सुपारी, शैलेश गोमसाळे यांच्या पथकाने राम सोनवणे याच्या मदतीने मुंबई येथील दादर बस स्थानक परिसरामध्ये ओमकारचा शोध सुरू केला असता ओमकार मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत फिर्यादी अजिनाथ केंदळे यांच्याकडे दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या