Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमCrime News : पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Crime News : पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडितेसह तरूणाला कोल्हापुरातून घेतले ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणार्‍या संशयित आरोपीस अहिल्यानगर तालुका पोलिसांनी तब्बल 11 दिवसांच्या शोधाशोधीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. ही कारवाई 9 जून रोजी करण्यात आली असून, संशयित आरोपीस 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

29 मे रोजी रात्री 8.30 च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे केलेल्या तपासात संशयित आरोपी कल्याण रामकिसन वाघमोडे (वय 21, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) याने पीडित मुलीस पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी व पीडितेस कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगवी (ता. कागल) येथून ताब्यात घेतले.

YouTube video player

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये, संशयित आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितल्याने, या गुन्ह्यात अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत कलम अंतर्भूत करून गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.
संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून 10 जून रोजी पहाटे अटक करण्यात आली.
संशयित आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे, पोलीस अंमलदार आबासाहेब झावरे व शरद वांढेकर यांनी केली.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...