Sunday, August 23, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलीवर धर्मांतराचा दबाव; पीडितेच्या जबाबातून माहिती

Crime News : अल्पवयीन मुलीवर धर्मांतराचा दबाव; पीडितेच्या जबाबातून माहिती

पोक्सो व विनयभंगाच्या कलमानुसार गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील एका व्यापार्‍याच्या अल्पवयीन मुलीसोबत सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोक्सो, विनयभंग कलमांची भर घातली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

गंज बाजार परिसरातील जुना कापड बाजार रस्त्यावर राहणार्‍या व्यापार्‍याच्या घरी सोमवारी (24 नोव्हेंबर) सकाळी सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलीकडे संशयित मुलाने अनधिकृतपणे घरात प्रवेश करून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास पीडितेच्या वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिली. मुलीने ही माहिती तातडीने वडिलांना दिल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. सुरूवातीला अनधिकृत प्रवेश आणि धमकावणे या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीचा सविस्तर जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांना अधिक माहिती समोर आली.

पीडितेची संशयित मुलासोबत सोशल मीडियावरून ओळख झाली होती. ओळखीच्या आधारे त्याने तिच्याशी सतत संपर्क ठेवला आणि आपल्या काही साथीदारांसह तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकत असल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. संबंधित संशयित व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी वारंवार संवाद साधत असे आणि तिला काही विशिष्ट व्यक्तींशी बोलण्यास भाग पाडत असे. पोलिसांनी हा मुद्दा गांभीर्याने घेऊन या प्रकरणाचा तपास धर्मांतर दबाव, विनयभंग आणि पोक्सो या अनुषंगाने सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : कागदावरील स्मार्ट सादरीकरण अन् रस्त्यावर २५ फुट खड्डा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिंहस्थाच्या ध्वजारोहणासाठी आता अवघे दोन महिने उरलेले असताना कुंभमेळा आयुक्तांनी, काळजी नको, सगळं काही ठीक होईल,...