Friday, August 21, 2026
Homeक्राईमतोंडाला मास्क लावून आले अन् अल्पवयीन मुलीला लुटले

तोंडाला मास्क लावून आले अन् अल्पवयीन मुलीला लुटले

मोबाईल, सोन्याच्या रिंगा घेतल्या काढून || पंपींग स्टेशन रस्त्यावरील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खासगी क्लासवरून मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला तोंडाला काळे मास्क लावून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी रस्त्यात अडवून लुटले. मुलीकडील मोबाईल व कानातील दोन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा बळजबरीने काढून घेतल्या. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पंपींग स्टेशन रस्त्यावर कराळे हेल्थ क्लबच्या अलिकडे ओढ्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी सारसनगरच्या चिपाडे मळ्यात राहणार्‍या अल्पवयीन मुलीने (वय 17) दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी अल्पवयीन मुलगी सावेडी उपनगरातील कुष्ठधाम रस्त्यावरील एका खासगी क्लाससाठी येत असते. बुधवारी सकाळी ती क्लासवरून कराळे हेल्थ क्लबच्या समोर राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीकडे दुचाकीवरून जात असताना पंपींग स्टेशन रस्त्यावरील ओढ्याजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने तिच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने मुलीकडे पैशाची मागणी केली.

तिने पैसे नसल्याचे सांगताच त्या दोघांनी मुलीकडील मोबाईल व कानातील दोन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा बळजबरीने काढून घेतल्या व तेथून पसार झाले. त्या दोघांनी तोंडाला काळे मास्क लावलेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, सदरचा प्रकार मुलीने घरी आल्यानंतर वडिलांना सांगितला. त्यांना सोबत घेऊन तोफखाना पोलीस ठाणे गाठले व फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मृत व बोटांचे ठसे न उमटणार्‍या साडेतीन हजार कर्जदारांना...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील मृत शेतकरी खातेदारांच्या वारसांना लाभ दिला जाणार आहे. याबरोबरच कर्जमुक्तीचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत...