Tuesday, March 3, 2026
Homeक्राईमCrime News : शिक्षकानेच केले आठवीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे शोषण

Crime News : शिक्षकानेच केले आठवीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे शोषण

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्याच्या पठारभागात एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवीमध्ये शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन विद्यार्थिनीचे शिक्षकाने शारीरिक शोषण करुन गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर घारगाव पोलिसांत झिरो नंबरने वर्ग झाला आहे.

- Advertisement -

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र, तिच्या घरगुती कारणामुळे शाळेत एकटी राहत होती. याचा गैरफायदा आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (वय 23) याने घेत ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिचे शारीरिक शोषण केले. ती पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असताना ती गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबावरुन पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी शिक्षक अमोल भोसले याच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर झिरो नंबरने हा गुन्हा घारगाव पोलिसांत वर्ग करण्यात आला आहे. यातील आरोपी शिक्षकाला अटक करुन न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत (दि.6) पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. डी. टकले हे करत आहे.

ताज्या बातम्या

Israel Iran War : नगर जिल्ह्यातील पाचजणांशी संपर्क

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अमेरिका-इस्त्राईल आणि इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये अनेक भारतीय अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील...