Monday, April 27, 2026
HomeनगरSangamner : संगमनेर शहर पोलिसांनी दोघा गांजा तस्करांना पकडले

Sangamner : संगमनेर शहर पोलिसांनी दोघा गांजा तस्करांना पकडले

कारवाईत सुमारे अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

शहरात अवैधरित्या गांजाची विक्री करणार्‍या दोन तरुणांना संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने सुकेवाडी-समनापूर रस्ता परिसरात रविवारी (दि.1) रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पकडले. या कारवाईत 6 लाख 44 हजार 700 रुपयांचा 21 किलो 490 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 4 लाख 50 हजार रुपये किमतीची कार असा एकूण 10 लाख 94 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पोहेकॉ. बाबा सातपुते, पोकॉ. विजय खुळे, राहुल पांडे, विजय आगलावे, राहुल नागरे, अतुल उंडे, राहुल क्षीरसागर, खेडकर यांचे पथक रात्र गस्तीवर असताना दोघेजण गांजाची अवैधरित्या विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना समजली होती. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पावणे नऊ वाजेच्या सुमारास सुकेवाडी-समनापूर रस्ता परिसरात प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (वय 26, रा.घुलेवाडी) आणि प्रथमेश सुरेश गोलवड (वय 21, रा.शिर्डी) यांना पाठलाग करुन पकडले.

या कारवाईत पोलिसांनी दोघांकडून 6 लाख 44 हजार 700 रुपयांचा 21 किलो 490 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 4 लाख 50 हजार रुपये किमतीची कार (क्र.एमएच.04, डीआर.7802) असा एकूण 10 लाख 94 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. विजय खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करत आहे. दरम्यान, यातील प्रथमेश राऊत हा सुकेवाडीसह इतर दोन गांजाच्या गुन्ह्यांत फरार होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik स्वतःला अवतार मानणार्‍या अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या आतल्या गोटातील माणसांनी दाखवलेले धाडस निर्णायक ठरल्याचे उघड झाले...