Thursday, May 21, 2026
Homeक्राईमParner : अल्पवयीन मुलींना धमकावून छेडछाड व अत्याचार

Parner : अल्पवयीन मुलींना धमकावून छेडछाड व अत्याचार

पालकांच्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द गुन्हा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलींना धमकावून छेडछाड व अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी पीडित मुलींच्या आई-वडिलांनी दिलेल्या दोन स्वतंत्र फिर्यादींवरून पारनेर पोलीस ठाण्यात पोस्को, अत्याचार व इतर कलमान्वये सात संशयित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनांमुळे तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

पहिली फिर्याद पीडित एका मुलीच्या आईने दिली आहे. त्यात नमुद करण्यात आले आहे, 9 मार्च रोजी त्या पारनेर येथून दुपारी चार वाजता घरी आल्या. दुपारी साडेचार वाजता त्यांच्या दोन्ही मुली घरी आल्या. फिर्यादीला संशय आल्याने त्यांनी लहान मुलीस विश्वासात घेऊन विचारले असता विशाल हुलावळे, प्रथमेश लोंढे व वैभव लोंढे यांनी रोहित चत्तर याचे (एमएच 12 एएफ 6625) या वाहनातून त्यांना वेसदरे येथे फिरण्यासाठी नेले होते. तुमचे आमच्याकडे फोटो आहेत. तुम्ही आल्या नाहीत तर ते व्हायरल करू अशी धमकी दिल्याचे मुलीने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी प्रवासादरम्यान संशयितांनी मुलींशी लगट करून विनयभंग केला.

पीडित मुलीचे काका घटनास्थळी पोहचले असता संशयित वाहन घेऊन तेथून पसार झाल्याचे फिर्यादीत नमुद आहे. पीडितेकडे चौकशी केली असता तीने सांगितले, 2 मार्च रोजी दुपारी 1 वाजता शुभम आल्हाट याने घरासमोर येऊन तिला धमकी दिली. तु मंदिरात ये नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल या धमकीमुळे मुलगी मंदीरात गेली. तिथे शुभम आल्हाट याने विनयभंग करत तिचे फोटो काढल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. दुसरी फिर्याद दुसर्‍या पीडित मुलींच्या वडिलांनी दिली आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, त्यांची मोठी मुलगी दहावीत तर लहान मुलगी सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. लहान मुलीसोबत करण्यात आलेल्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर मोठ्या मुलीनेही आपल्यावर झालेले अत्याचार कथन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोठ्या मुलीची ओळख प्रसाद संदीप साळवे याच्यासोबत झाली. या ओळखीचा फायदा घेत प्रसाद याने 25 डिसेंबर रोजी मुलीस जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला व धमकी दिली. प्रसादने अत्याराची माहिती अनिल उर्फ गुंड्या किशोर साळवे याला दिली. 4 फेब्रुवारी रोजी अनिलने पीडितेला शाळेजवळ गाठून प्रसादने अत्याचार केल्याचे समजले आहे, तु जर मला घरी भेटण्यासाठी आली नाही तर मी ही माहिती व्हायरल करेल अशी धमकी दिली. अनिलने देखील त्याच्या घरी पीडितेला बोलवून घेत अत्याचार केला, असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. प्रसाद संदीप साळवे, अनिल उर्फ गुंड्या किशोर साळवे, विशाल अनिल हुलावळे, प्रथमेश शंकर लोंढे, वैभव पोपट लोंढे, शुभम आल्हाट, रोहित संजय चत्तर सर्व (रा. कान्हूरपठार ता. पारनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हाभरात औषधांची 8300 दुकाने बंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ऑनलाईन फार्मसी कंपन्यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि औषध विक्रीतील अनियमित सवलतींना आळा घालण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाला बुधवारी...