Wednesday, October 9, 2024
Homeक्राईमअल्पवयीनची छेड काढणार्‍यांवर गुन्हा दाखल

अल्पवयीनची छेड काढणार्‍यांवर गुन्हा दाखल

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

13 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग करणार्‍या विद्यार्थ्यांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशा टवाळखोर तरुणांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत असून या आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातून ही विद्यार्थिनी पाथर्डी शहरात एका विद्यालयात आठवीचे शिक्षण घेण्यासाठी रोज बसने प्रवास करत असून शनिवारी (दि. 28) रोजी पीडित विद्यार्थिनी मैत्रिणी समवेत शाळेतून घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात बसची वाट पहात होती.

- Advertisement -

त्यावेळी विद्यार्थिनीच्या गावातीलच एका तरुणाने अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत संबंधित विद्यार्थिनीने शनिवारी पोलिसांत फिर्याद दिली. विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसस्थानकात आली. बसची वाट पाहत असताना, गावातील तरुण समोर येऊन बसला. मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करू लागला. मात्र, त्याकडे विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले. त्यानंतर त्या विद्यार्थिनीकडे जाऊन हा तरुण म्हणाला, किती वाजले आहेत अशी विचारणा करत मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणून तिची छेड काढली. त्यानंतर संबंधित मुलीने पालकांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली.

अनेक दिवसांपासून हा तरुण तिची छेड काढत होता. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केले. अशा टवाळखोर तरुणांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत असून या आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या