Wednesday, May 6, 2026
Homeक्राईमNashik Crime News : लष्करी रुग्णालयात 'सर्जिकल स्ट्राईक'; ८२ लाखांच्या इन्शुलिनची चोरी

Nashik Crime News : लष्करी रुग्णालयात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ८२ लाखांच्या इन्शुलिनची चोरी

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संगनमताने काळाबाजार उघड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय लष्कराच्या देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जवानांच्या उपचारासाठी पाठविलेल्या तब्बल ८१ लाख ९९ हजार रुपयांच्या महागड्या ‘इन्शुलिन’ इंजेक्शन्सची चोरी करून त्यांचा काळाबाजार केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांच्या अंतर्गत तपासानंतर लष्कराने या प्रकरणाचा छडा लावला असून, यात एका निलंबित लष्करी शिपायाचा आणि एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मुख्य सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

मे २०२४ मध्ये मुंबईतील (Mumbai) कांदिवली येथील आर्मीच्या मेडिकल स्टोअर डेपोतून देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलसाठी १३३ बॉक्समध्ये विविध प्रकारची औषधे पाठवण्यात आली होती. यामध्ये मधुमेह (हाय ब्लड शुगर) नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी अत्यंत महागडी ‘इन्शुलिन डेग्लुडेक’ आणि ‘ह्युमन इन्शुलिन’ अशी एकूण बारा हजार ६६२ इंजेक्शन्स होती. या औषधांची सुरक्षित ने आण करण्याची जबाबदारी संबंधित विभागावर असताना, संशयित नीरजने संगनमत करून ही औषधे परस्पर लंपास केली.

तत्कालीन लष्करी शिपाई नीरज सिंग (सध्या निलंबित) आणि सेवानिवृत्त कर्मचारी संशयित विनायक विठ्ठल कांबळे यांनी ही औषधे मिलिटी हॉस्पिटलमध्ये जमा करण्याऐवजी देवळाली कॅम्पच्या बनात चाळीतील घरी उतरवली. तेथे औषधांचे मूळ बॉक्स फोडून त्यांची पुन्हा ‘रि-पॅकिंग’ केली. ही औषधे टाटा एस टेम्पोतून (एमएच १५ जेसी ६१८१) पुण्यातील कलाशंकर नगरातील नीरज सिंग याच्या घरी पाठवण्याचा कट रचल्याचे आर्मी इंटेलिजन्सच्या तपासात समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आता प्रकरणाच तपास गुन्हे शोध पथकाकडे (Crime Branch) वर्ग करण्यात आला आहे.

दोन वर्षांच्या तपासानंतर कारवाई

या चोरीचा संशय आल्यानंतर लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील दोन वर्षे या प्रकरणाचा पाठपुरावा केला. देवळालीतील हॉस्पिटलचे सिनिअर रजिस्ट्रार कर्नल दविंदर भारद्वाज यांच्या सूचनेनुसार सुभेदार रामराव निवृत्ती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीरजसह कांबळेवर गुन्हा नोंद झाल आहे.

जप्त औषधांचा तपशील

  • १३ हजार ८८ हजार ८०० रुपये किमतीचे ९९२ मग इन्शुलिन
  • ५२ लाख १३ हजार रुपये किमतीचे १० हजार ६९८ नग ह्यूमन इन्शुलिन
  • १५ लाख ९७, हजार १२० रुपये किमतीचे ९७२ नग इन्शुलिन
  • एकूण रक्कमः ८१ लाख ९९ हजार रुपये

ताज्या बातम्या

राधा

पंढरपूरमध्ये नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ, किरकोळ कारणावरुन हुल्लडबाजांचा तुफान...

0
सोलापूर | Solapurपंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गावात सुरू असलेल्या यात्रेनिमित्त आयोजित या...