Tuesday, July 28, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलीची छेड; जाब विचारणार्‍या नातेवाईकांवर हल्ला

Crime News : अल्पवयीन मुलीची छेड; जाब विचारणार्‍या नातेवाईकांवर हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा आणि त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या कुटुंबीयांवर दोन तरूणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलिसांनी दोघांविरूध्द विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हसनेन गणी पटेल आणि आयान बेग (दोघे रा. जखणगाव, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

संशयित आरोपींनी 3 ऑक्टोबर व 18 ऑक्टोबर रोजी, अशा दोन वेगवेगळ्या दिवशी पीडित 14 वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढली व तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा प्रकार सहन न झाल्याने 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडितेचा भाऊ हा संशयित आरोपींना जाब विचारण्यासाठी गेला.

त्यावेळी संतापलेल्या संशयित आरोपींनी त्याला लाथाबुक्कीने व बेल्टने मारहाण करून जखमी केले. हे भांडण सुरू असताना पीडितेची 40 वर्षीय चुलती विचारपूस करण्यासाठी व भांडण सोडवण्यासाठी पुढे आल्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला चढवला. एका धारदार वस्तूने वार केल्याने त्या जखमी झाल्या. घडलेल्या या गंभीर प्रकारानंतर पीडितेच्या वडिलांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : जायकवाडीचा साठा 58.52 टक्क्यांवर

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरूपाचे आगमन होत आहे. धरणातील विसर्ग नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने घटविण्यात आले आहेत. गोदावरीत काल सायंकाळी...