Monday, October 5, 2026
Homeक्राईमदोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

भिंगार व नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. भिंगार कॅम्प व नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरूध्द अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मूळ बिहार व सध्या मुकुंदनगर परिसरात राहत असलेल्या 50 वर्षीय महिलेने शनिवारी (16 नोव्हेंबर) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी कामानिमित्त घराच्या बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगी (वय 17) घरी होती. तिला सकाळी साडेनऊ ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. फिर्यादी यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यांनी शनिवारी कॅम्प पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख करत आहेत.

नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या वृध्द व्यक्तीने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने बुधवारी (13 नोव्हेंबर) सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पळवून नेले. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यांनी शनिवारी तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सातभाई करत आहेत.

ताज्या बातम्या

एकनाथ

Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; अचानक...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आज, 5 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती...