Friday, May 3, 2024
Homeनगरभविष्यात आदिक हेच श्रीरामपूरचे आमदार व नामदार- आशुतोष काळे

भविष्यात आदिक हेच श्रीरामपूरचे आमदार व नामदार- आशुतोष काळे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सध्या या मतदार संघात आरक्षण आहे. त्यांनतर भविष्यात आदिक हेच श्रीरामपूरचे आमदार असतील, असे सूचक वक्तव्य साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील संपर्क कार्यालयास ना. काळे यांनी धावती भेट दिली. यावेळी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त तथा माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी त्यांचा सत्कार केला. सत्कारास उत्तर देताना ना. काळे बोलत होते.

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी श्रीरामपूर शहरासाठी मोठा निधी दिला आहे. तशी कामेही झाली असून शहरात प्रवेश करताच विकास कामांची प्रचिती येते. यापुढचे भवितव्य हे आदिक यांच्या हातात राहणार आहे. तालुक्याला स्व. गोविंदराव आदिक यांचा वारसा असल्याने आरक्षणानंतर श्रीरामपूरचे आमदार हे आदिकच असतील, विकासासाठी जे कमी पडेल ते देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सागत शहरात खूप चांगली कामे आपण केली आहेत, अशा शब्दांत त्यांनी अनुराधा आदिक यांचा गौरव केला.

अनुराधा आदिक म्हणाल्या, ना. काळे यांनी कोपरगावचा चेहरा बदलवला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना खूप मोठी संधी दिली आहे. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार व बोर्डे यांनी आदिक यांनी पालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.

यावेळी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, डॉ. रवींद्र जगधने, मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे, ताराचंद रणदिवे, अर्चना पानसरे, जयश्री जगताप, सोनल मुथा, सुनील थोरात, दीपक कुर्‍हाडे, सुमित मुथा, भागचंद औताडे, योगेश जाधव, राजाभाऊ पठाडे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, ऋषी डावखर, अ‍ॅड. जयंत चौधरी, भैया भिसे, विजय नगरकर, मनोज नवले, इसाक पटेल, अनील इंगळे, विलास सासे, गणपतराव औताडे, गणेश तनपुरे, राजेंद्र पानसरे, सूर्यकांत सगम, बन्सी फेरवाणी, रवी गरेला, तोफिक शेख, मनीषा थोरात, सोहेल शेख, सैफ शेख, सलीम शेख, अल्तमश पटेल, गोपाल वायनदेशकर, रंजन वावळ, आदित्य आदिक, अर्जुन आदिक, एजाज पठाण, सागर कुर्‍हाडे, जाकीर शेख आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या