Friday, May 3, 2024
Homeनगरअकोले तालुक्यात ऑक्सिजन प्लँट उभारणार- आ. डॉ. लहामटे

अकोले तालुक्यात ऑक्सिजन प्लँट उभारणार- आ. डॉ. लहामटे

अकोले |प्रतिनिधी| Akole

आदिवासी उपयोजनेतून अकोले तालुक्यात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार आहे, त्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आ. डॉ. किरण लहामटे यांनी दिली. महिनाभरात प्लॅन्ट उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील आरोग्य यंत्रणा चांगली काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव खांडगे, उद्योजक सुरेश गडाख, युवक शहराध्यक्ष अमित नाईकवाडी, खजिनदार चंद्रभान नवले, विकास वाकचौरे, संतोष नाईकवाडी, संदीप शेणकर, अक्षय आभाळे, सुरज वाडगे, हरिश माने यांचेसह तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे हे उपस्थित होते.

आ. डॉ. लहामटे म्हणाले, अकोले तालुक्यातील करोनाच्या दुसर्‍या लाटेला आपण तोंड देत आहोत. तालुक्यात 800 ते 850 बेड आहेत. 700 ते 750 सी सी सी चे बेड आहेत.डी सी सी सेंटर ला 24 रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 650 ते 700 च्या आसपास आहे. त्यातील 450 रुग्ण तालुक्यातीच वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत. तर बाकी रुग्ण संगमनेर येथे उपचार घेत आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात बेड्स शिल्लक आहेत. करोना रुग्णांची परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेऊन लवकरच आदिवासी उपयोजनेतून एक महिन्याच्या आत 1 कोटी 20 लाख रुपयांचा ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट चालू होणार असून पुढील दोन महिन्यात रिफिलिंग चा प्लॅन्ट ही सुरू होणार असल्याचे आ. डॉ. लहामटे यांनी सांगितले.

शिक्षकांच्या योगदानातून इतर संस्थांच्या सहकार्यातून सुगाव खुर्द येथे 50 ऑक्सिजन बेडसचे कोविड सेंटर आज, उद्या सुरू होणार आहे. त्यासाठी लागणार्‍या ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेशी चर्चा करून सिन्नर एमआयडीसी येथून तसेच अहमदनगर व संगमनेर येथून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका सर्व्हे करीत आहे. त्यांना सहकार्य करा. ग्राम सुरक्षा समिती ने टेस्ट झालेल्या व्यक्तींचे विलगीकरण करावे. 12 हजार 180 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर 2 हजार 315 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेेल्या नागरिकांनी दुसरा डोस वेळेतच घ्यावा. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आ. लहामटे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या