Friday, May 3, 2024
Homeनगरविरोधक पाणी प्रश्नी राजकारण करून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत- आ....

विरोधक पाणी प्रश्नी राजकारण करून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत- आ. डॉ. लहामटे

कोतुळ |वार्ताहर| Kotul

माझ्या अगोदर ज्यांनी पाण्याचे राजकारण केले तसे माझ्या कडून होणार नाही. खालचे आणि वरचे असा भेदभाव मी करणार नाही.

- Advertisement -

मी सम्पूर्ण मतदार संघाचा पालक आहे. तशीच भूमिका माझी राहील. विरोधक पाण्याचा वाद निर्माण करून जनतेत विष कालवून जनतेत संभ्रम निर्मान करत असल्याचा आरोप आमदार डॉ किरण लहामटे यांनी पिचड पिता -पुत्रांचे नाव न घेता केला.

तालुक्यातील कोतुळ येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख होते.यावेळी राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव खांडगे, ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी,कैलासराव शेळके ,राष्ट्रवादी महिलाध्यक्षा स्वातीताई शेणकर, ओबीसी सेल च्या उज्वला राऊत रामनाथ शिंदे, नवनाथ गायकवाड, नामदेव भांगरे, नारायण डोंगरे, कोतुळ चे सरपंच भानुदास लोहकरे उपसरपंच संजय देशमुख, शंकरराव देशमुख, संगीता भुजबळ, जलसंपदा चे उपविभागीय अधिकारी संदीप देशमुख, शाखा अभियंता नानासाहेब खर्डे, शिवा इन्स्ट्राकचरचे संचालक मुकुंद देशमुख सिनियर प्रोजेक्ट्स मॅनेजर डी.एन. मोहिते प्रकल्प प्रमुख अलोककुमार सिंग , ईश्वर वाकचौरे ,अशोक माळी , अरुण रुपवते, सयाजीराव देशमुख चंद्रकांत घाटकर, शाम देशमुख, फारूक पठाण,आदी सह परिसरातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

डॉ लहामटे पुढे म्हणले की- कोतुळ पुलाचे काम होणे हे मुळा विभागाचे विकासाचे दृष्टीने महत्वाचं आहे. तालुक्यातील कोतुळ ही मोठी बाजार पेठ आहे . पुलाचे काम करताना लाभधारक शेतकर्‍यांची नुकसान होणार नाही ही भूमिका प्रशासनाची राहील . 2024 पर्यँत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले, नागरिकांनी या कामासाठी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले. माझा नेता शरद पवार आहे, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विकास कामे पूर्ण करण्यात येत आहे. पिंपळगाव खांड धरण व कोतुळ पुलासासाठी अजितदादा पवार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने हे काम मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी सेवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी बी जे देशमुख यावेळी की – समाजाचें प्रश्नाची जाण असणारा नेता अजित दादानी खमकी भूमिकां घेतल्यानें पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती झाली .त्यावेळी कोतुळ चा पूल पाण्यात बुडणार हे माहीत असतानाही तालुक्यातील नेतृत्वाने हा प्रश्न जाणीवपूर्वक मागे ठेवला. त्याचे परिणाम मुळा परिसराने भोगले आहे .मी प्रशासनात सेवेत असताना अनेक आमदार पाहिले मात्र आमदार लहामटे सारखा जनते सासाठी रात्रंदिवस पळणारा माणूस प्रथमच पाहिल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप यांनी पुलाचे कामाची तांत्रिक माहिती दिली. या प्रसंगी उद्योजक सुरेश गडाख ,युवा नेते सचिन नरवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, कॉ सदाशिव साबळे, अभिजित देशमुख, सचिन गीते यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख व रविंद्र आरोटे यांनी सूत्रसंचालन केले तर पूल कृती समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी आभार मानले.

अकोले तालुक्यात शिदवड-लिंगदेव येथे एम आय डी सी उभी करण्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे .त्याची प्रक्रिया सुरू आहे .या कामा साठी तुम्ही जमिनी घ्या. तुमच्याकडून एमआयडीसी साठी जमिनी विकत घेऊ , त्यात तुम्हाला पैशे मिळवून देऊ अशी ऑफर मला आली होती मात्र त्या ऑफर ला मी लाथ मारली असा गौप्यस्फोट आमदार लहामटे यांनी केला .माझ्या जागी माझे विरोधक असते तर त्यांनी काय केले असते हे जनतेला माहीत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या